खेळाडू्ंसाठी गुडन्यूज! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI ने केली मोठी घोषणा; काय होणार?

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा उद्यापासून पाकिस्तानात (Champions Trophy 2025) सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. भारतीय संघाचे सामने (Team India) दुबईत होणार आहेत. भारताचा पहिला सामना गुरुवारी बांग्लादेश विरुद्ध (Bangladesh) होणार आहे. या सामन्याआधी भारतीय खेळाडुंसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून एका नियमात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळाडूंचे कुटुंबीय एक सामना पाहू शकतील. बीसीआयने खेळाडू्ंच्या कुटुंबियांना एक सामना पाहण्याची सवलत दिली आहे. परंतु, यासाठी आधी परवानगी घ्यावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब राहिली होती. अतिशय लाजिरवाण्या पद्धतीने टीम इंडियाला मालिका गमवावी लागली होती. माजी खेळाडूंनी प्रचंड टीका केली होती. यानंतर कठोर निर्णय घेण्यास बीसीसीआयने सुरुवात केली होती. भारत खेळाडूना परिवार सोबत घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आता या निर्णयात थोडा बदल होण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंकेने रचला इतिहास, विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी केला पराभव
बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार भारतीय खेळाडू विदेश दौऱ्यावर आपल्या कुटुंबासमवेत काही वेळ घालवू शकतात. जर हा दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी असेल तर ही सवलत खेळाडूंना मिळेल. परंतु, हा कालावधी कमी असेल तर ही सवलत मिळणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा साधारण महिनाभर सुरू राहील. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही सवलत शक्यतो मिळणार नाही.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा उद्यापासून (19 फेब्रुवारी) सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना गुरुवारी (20 फेब्रुवारी) बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांविरूद्धही भारताचे साखळी सामने होणार आहेत. 23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडला टक्कर देणार आहे. हा सामना 2 मार्च रोजी होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ८ संघ अन् १५ सामने; कसा ठरणार विजेता?, चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉरमॅट काय?