Download App

पाकिस्तानची पुन्हा फजिती! तिकीट विक्री सुरू पण मैदानेच अर्धवट; ICC ची डेडलाइन हुकणार?

पीटीआय न्यूज एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की ब्रँडिंग आणि अन्य कामकाजासाठी मैदाने 11 फेब्रुवारीपर्यंत आयसीसीकडे सोपवण्यात येतील.

Champions Trophy 2025 : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन (Champions Trophy 2025) पाकिस्तान करणार आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून ही टूर्नामेंट सुरू आहेत. तरीदेखील पाकिस्तानची तयारी पूर्ण झाल्याचे दिसत नाही. रावळपिंडी, कराची, लाहोर येथील मैदानांचे फोटो सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था नाही तर काही ठिकाणी कामे अर्धवट राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशातच आता या मैदानांबाबत मोठी अपडेट मिळाली आहे.

पीटीआय न्यूज एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की ब्रँडिंग आणि अन्य कामकाजासाठी मैदाने 11 फेब्रुवारीपर्यंत आयसीसीकडे (ICC) सोपवण्यात येतील. याआधी आयसीसीने 31 जानेवारीची मुदत दिली होती. परंतु, पीटीआयच्या रिपोर्टमधून तर वेगळीच कहाणी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ही (Pakistan Cricket Board) डेडलाइनही मिस होण्याची दाट शक्यता आहे. या मुदतीनुसार आज शेवटचा दिवस आहे आणि अजूनही मैदाने आयसीसीकडे सोपवलेली नाहीत.

बुद्धीबळपटूंनी गाजवली बुद्धीबळ चॅम्पियनशिप स्पर्धा, सुरेंद्र पठारे फाऊंडेशन तर्फे आयोजन

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता या मैदानांना फिनिशिंग टच देण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु, अजूनही काही ठिकाणी मोठे दगड पडले आहेत. हे दगड लवकरात लवकर हटवून मैदाने तयार केली जातील. पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉनच्या रिपोर्टनुसार डेडलाइनमध्ये मैदाने पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. परंतु, या स्पर्धांआधी मैदाने तयार झालेली असतील असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी वारंवार सांगत आहेत. कराचीच्या मैदानावर सर्वांचे लक्ष आहे. कारण, स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारीला याच मैदानावर होणार आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघांत होणार आहे.

पीसीबीने कराची, रावळपिंडी आणि लाहोर या मैदानांच्या नुतनीकरणासाठी 1200 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम 373 कोटी रुपये आहे. स्पर्धांसाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. परंतु, मैदाने कधी तयार होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार; उपचारांसाठी ‘BCCI’ न्यूझीलंडला पाठवण्याच्या तयारीत

follow us