Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (Trophy 2025) उद्या रविवारी (९ मार्च) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळवला जाणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना दुपारी २.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे. वनडे क्रिकेट प्रकारातील वर्ल्ड कपनंतरची सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते.
या स्पर्धेनंतर आता वर्ल्ड कपला अद्याप २ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे ही स्पर्धा कदाचित भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी अखेरच्या वनडे स्पर्धा ठरू शकते, अशी चर्चा आहे. रोहित या स्पर्धेनंतर वनडेतून निवृत्ती घेऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यावर आता शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे.
Champions Trophy 2025 : वरुण चक्रवर्तीची दुबईत जादू ! गेलेला सामना भारताला जिंकून दिला
आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये एका बाजूला मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात गंभीर संभाषण झाल्याचे चित्र होते, तर दुसऱ्या बाजूला संघाचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली विचारात बुडालेले होते. त्या दोघांच्या देहबोलीवरून आणि विराट ज्या प्रकारे रोहितला लक्ष देऊन ऐकत होता त्यावरून हे स्पष्ट होत होतं की रोहित विराटला काहीतरी बोलतोय जे खुद्द कोहलीसाठी आश्चर्यापेक्षा होतं. त्यावरून निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत.
रोहित शर्मा यशस्वी कर्णधार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. त्याच वेळी, त्याने एकदिवसीय विश्वचषक 2023 आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही धडक मारली. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीतही पोहचला आहे. दुबईत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना रोहितचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे.