Download App

टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? शक्यता नाहीच, बीसीसीआयने दिले दोन पर्याय

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पाहता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाही.

ICC Champions Trophy Pakistan : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुढील (ICC Champions Trophy) वर्षात पाकिस्तानात होणार आहे. टी 20 वर्ल्डकपनंतर या स्पर्धांची तयारी आयसीसीने सुरू केली आहे. तर दुसरीकडे टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात जाऊन (Pakistan) खेळणार का असा प्रश्न चर्चेत आला आहे. मागील काही वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पाहता भारतीय संघ पाकिस्तानात गेलेला नाही. याआधीच्या आयसीसी स्पर्धांतील भारत पाकिस्तान यांच्यातील सामने अन्य ठिकाणी खेळवण्यात आले होते. त्यामुळे यंदाही भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

एका रिपोर्टनुसार बीसीसीआय याबाबत आयसीसीशी चर्चा करणार आहे. यावेळी स्पर्धांचे आयोजन हायब्रीड मॉडेलनुसार होऊ शकते. टीम इंडियाचे सामने दुबई किंवा (Dubai) श्रीलंकेत आयोजित केले जाऊ शकतात. याआधीच्या आशिया कप स्पर्धेतही अशाच पद्धतीने सामने आयोजित करण्यात आले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाही. या स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित करावेत अशी मागणी बीसीसीआय आयसीसीकडे करणार आहे. याआधीच्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते.

टी20 वर्ल्डकपआधीच विंडीजला झटका; अनुभवी खेळाडूवर ICC कडून 5 वर्षांची क्रिकेटबंदी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघातील कोणताही खेळाडू पाकिस्तानात (IND vs PAK) जाण्यासाठी तयार नाही. सध्या या संदर्भात फक्त चर्चा सुरू आहे. भारतीय संघ पाकिस्तानात जाण्यासाठी तयार नाही. पण, मागील वर्षात भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. याच कारणामुळे सध्या चर्चा सुरू आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धांच्या वेळापत्रकाचा एक ड्राफ्ट आयसीसीला दिला होता. यात भारत आणि पाकिस्तान सामना लाहोर शहरात आयोजित करण्याचे नियोजित केले होते. 1 मार्च रोजी हा सामना होणार होता. परंतु, टीम इंडियाने नकार दिल्यामुळे या नियोजनावर पाणी पडले. सुरक्षिततेचा विचार करुन बोर्डाने भारताचे सामने लाहोरमध्ये आयोजित केले होते.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धांची तयारी सुरू केली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून मैदानांची दुरुस्ती करण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. यावर कामही सुरू करण्यात आले आहे. या स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहेत. या गटात न्यूझीलंड, बांग्लादेशही आहे. ग्रुप बीमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ आहेत.

गौतम गंभीरची वाट खडतर; रोहित-विराटला पर्याय अन् 5 आयसीसी स्पर्धांचं चॅलेंज

follow us