गौतम गंभीरची वाट खडतर; रोहित-विराटला पर्याय अन् 5 आयसीसी स्पर्धांचं चॅलेंज

गौतम गंभीरची वाट खडतर; रोहित-विराटला पर्याय अन् 5 आयसीसी स्पर्धांचं चॅलेंज

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाला अखेर नवा हेड कोच मिळाला आहे. माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनंतर (Rahul Dravid) आता टीम इंडियाला माजी सलामीवीर गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) मार्गदर्शन मिळणार आहे. मंगळवारी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. दरम्यान, भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर (IND vs ZIM) आहे. यानंतर 27 जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात (IND vs SL) तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कोच म्हणून गौतम गंभीर असेल. तर दुसरीकडे श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयासुर्याला हेड कोच (Sanath Jayasuriya) नियुक्त केले आहे. क्रिकेट संघ मैदानात तर नवे हेड कोच यांच्यात मैदानाबाहेरचा सामना रंगणार आहे.

गौतम गंभीरच्या सर्वात महत्त्वाच्या कामगिरीचा विचार केला तर 2007 मधील टी 20 वर्ल्डकप आणि 2011 च्या वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यातील मॅच विनिंग खेळी. या दोन्ही वर्ल्डकपमध्ये गंभीरने अतिशय शानदार कामगिरी केली होती. भारताला विजयी करण्यात त्याचे मोठे योगदान राहिले. सध्याच्या भारतीय संघात असे दोन खेळाडू आहेत ज्यांच्या बरोबर गौतम गंभीर संघात होता.

राहुल द्रविडचा दिलदारपणा; सहकाऱ्यांसाठी अडीच कोटींच्या बोनसवर सोडलं पाणी

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे ते दोन खेळाडू आहेत. सन 2007 मधील टी 20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय संघात होता. तर 2011 च्या वन डे विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) संघात होता. या विश्वचषकातील अंतिम सामन्यात सुरुवातीलाच वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर दोघे बाद झाले होते. त्यामुळे संघ दडपणात आला होता. अशा वेळी गौतम गंभीर आणि विराट कोहली या दोघांनी मोठी भागीदारी करत संघाला सावरले होते.

आता रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहेत. लवकरच हे दोघे निवृत्त होतील. तसेही दोघांनी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहेच. याच दरम्यान गौतम गंभीरची हेड कोचच्या रूपात पुन्हा एन्ट्री झाली आहे. आता गंभीरवर विराट आणि रोहित यांना पर्याय शोधण्याची जबाबदारी राहणार आहे.

जुलै 2024 ते डिसेंबर 2027 या काळात गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी राहणार आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मुख्य प्रशिक्षक गंभीरच राहणार आहे. गंभीरच्या कार्यकाळात भारतीय संघ पाच आयसीसी स्पर्धा खेळणार आहे. जानेवारी 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) होणार आहे. जून 2025 मध्ये इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी स्पर्धेचा फायनल सामना होणार आहे.

Team India: भारतीय टीमच्या स्वागताला गुजरातहून बस का मागवल्या? राऊतांनी केला मोठा खुलासा

यानंतर 2026 मध्ये श्रीलंका आणि भारतात टी 20 वर्ल्डकप होणार आहे. तसेच 2027 मधील जून महिन्यात पुन्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना होणार आहे. याच वर्षात वन डे विश्वचषक स्पर्धा होणार आहेत.

गौतम गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर गंभीरने एकूण 58 कसोटीतील 104 डावात 4 हजार 154 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतक आणि 22 अर्ध शतकांचा समावेश आहे. 147 वन डे सामन्यातील 143 डावात त्याने 5 हजार 238 धावा केल्या. यामध्ये 11 शतके आणि 34 अर्ध शतकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त गौतम गंभीरने 37 टी 20 सामनेही खेळले असून 932 रन केले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज