Jos Buttler : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (Champions Trophy 2025) साधारण कामगिरी करणाऱ्या इंग्लंड संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून तो आपला शेवटचा सामना खेळणार आहे.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 विकेट्सने आणि अफगाणिस्तान संघाने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला होता.
BREAKING: Jos Buttler has stood down as England white-ball captain, following his side’s Champions Trophy exit 🚨 pic.twitter.com/BQ5yiy4yTa
— Sky Sports Cricket (@SkyCricket) February 28, 2025
कर्णधारपद सोडल्यानंतर बटलर म्हणाला की, मी इंग्लंडचे कर्णधारपद सोडणार आहे. हा माझ्यासाठी आणि संघासाठीही योग्य निर्णय आहे. आशा आहे की ब्रेंडन मॅक्युलमसोबत दुसरा कोणीतरी येऊ शकेल जो संघाला जिथे घेऊन जाण्याची गरज आहे तिथे घेऊन जाईल. पुढे तो म्हणाला की मला माझ्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे.
मोठी बातमी! स्वारगेट प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेला पोलीस कोठडी
तर दुसरीकडे इंग्लंड संघाने जोस बटलरच्या नेतृत्वाखाली 44 एकदिवसीय सामने खेळले. या काळात संघाने 18 सामने जिंकले. बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला 25 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, एक सामना अनिर्णीत राहिला होता.
टी-20 मध्ये जोस बटलरच्या नेतृत्वाखाली, इंग्लंडने 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले. 2024 मध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडनेही उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत इंग्लंड संघाला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता.