Cheteshwar Pujara : कौंटी क्रिकेटमध्ये पुजाराचा दबदबा; ठोकले दमदार शतक

Cheteshwar Pujara : भारतीय कसोटी संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या काउंटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. तो कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघाकडून खेळत असून जबरदस्त फॉर्ममध्येही दिसत आहे. डरहमविरुद्धच्या सामन्यात पुजाराने प्रथमच कर्णधारपद भूषवले आणि शानदार शतक झळकावले. कौंटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या विभागात ससेक्सकडून खेळताना पुजाराने डरहमविरुद्ध शतक झळकावले. ब्रायडेन कार्सला लागोपाठ चौकार ठोकत त्याने आपले शतक […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T153055.265

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 08T153055.265

Cheteshwar Pujara : भारतीय कसोटी संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या काउंटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. तो कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघाकडून खेळत असून जबरदस्त फॉर्ममध्येही दिसत आहे. डरहमविरुद्धच्या सामन्यात पुजाराने प्रथमच कर्णधारपद भूषवले आणि शानदार शतक झळकावले.

कौंटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या विभागात ससेक्सकडून खेळताना पुजाराने डरहमविरुद्ध शतक झळकावले. ब्रायडेन कार्सला लागोपाठ चौकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याने 134 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

BJP Mission South : दक्षिणेत भाजपच्या ‘कमळा’समोरची आव्हाने अन् राजकीय समीकरणं

चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यावेळी 10व्या षटकात धावसंख्या 44/2 होती. त्यानंतर पुजाराने शानदार फलंदाजी करत 163 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 115 धावा केल्या. त्याने टॉम क्लार्कसोबत 112 धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले. याआधी ससेक्सने पहिल्या डावात डरहमला ३७६ धावांत गुंडाळले होते.

चेतेश्वर पुजाराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५७ वे शतक आहे. त्याने आतापर्यंत 246 सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 18 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी 51 पेक्षा जास्त आहे. पुजाराने याआधी इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

आदित्य ठाकरेंना जमिनीवर आणायचं काम शिंदेंनी केलं; अयोध्या दौऱ्यावर केलेल्या टीकेला गोगावलेचं सणसणीत उत्तर

पुजाराने गेल्या काऊंटी हंगामात आठ सामन्यांत १०९.४० च्या प्रभावी सरासरीने १०९४ धावा केल्या आणि त्यात पाच शतकांचा समावेश आहे. यानंतर त्याने रॉयल लंडन वन डे चषकात 9 डावात तीन शतके झळकावत 624 धावा केल्या.

Exit mobile version