Download App

मोठी बातमी! आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 2025 च्या (Asia Cup 2025 Schedule) वेळापत्रकाची घोषणा झाली आहे.

Asia Cup 2025 Schedule : आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 2025 च्या (Asia Cup 2025 Schedule) वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. एशियन क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी आशिया कप (Asia Cup 2025) स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. स्पर्धेतील अखेरचा सामना 28 सप्टेंबर या दिवशी होणार आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सध्या या स्पर्धेतील पहिल्या आणि अखेरच्या सामन्याच्याच तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मोहसीन नकवी यांनी सांगितले की आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना येत्या 9 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. फायनल सामना 28 सप्टेंबर रोजी होईल. आशिया क्रिकेट काउंसिलची एक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांनी आपसातील वाद बाजूला ठेवत आशिया कपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियम अनसेफ; ‘त्या’ घटनेनंतरच्या अहवालात धक्कादायक खुलासा

या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले होते. परंतु, नंतर बीसीसीआयने ही स्पर्धा एखाद्या तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची तयारी दाखवली होती. तरीही या स्पर्धेत भरत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळणार (India vs Pakistan) का याबाबत संभ्रम आहे. या दोन्ही संघांतील सामन्याची घोषणा झाली असली तरी काहीही निर्णय होऊ शकतो. याबाबतीत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आशिया कप क्रिकेट स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरला होईल हे आता निश्चित झाले आहे. तर फायनल सामना 28 सप्टेंबरला होईल. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यामुळेच ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातेतील दुबई आणि अबुधाबी या दोन ठिकाणी होत आहे.

स्पर्धेत प्रथमच आठ संघ

आशिया कप स्पर्धेत यंदा आठ क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. पहिल्यांदाच आठ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सन 1984 मध्ये पहिल्यांदाच या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत एकूण 16 वेळेस स्पर्धा झाली आहे. परंतु, 2025 मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, हाँगकाँग, युएई आणि ओमान या संघांचा समावेश आहे.

आशिया कप 2023 भारत विजेता

आशिया कपचा शेवटचा हंगाम 2023 मध्ये खेळला गेला होता. त्याचा अंतिम सामना कोलंबो येथे झाला होता ज्यामध्ये भारताने विजय मिळवला होता. अंतिम फेरीत श्रीलंकेचा संघ 50 धावांवर गुंडाळला गेला. भारतासाठी, वेगवान गोलंदाज सिराजने 7 षटकांत 21 धावा देत 6 बळी घेतले होते. टीम इंडियाने 51 धावांचे लक्ष्य फक्त 6.1 षटकांत पूर्ण केले.

Yashasvi Jaiswal ने रचला इतिहास, 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्ड मैदानांवर घडलं असं काही…

follow us