Download App

Ind vs Ban : स्टेडियम रिकामेच, मग तिकीटे गेली कुठे? संतप्त क्रिकेट चाहत्यांचा BCCI, MCA ला सवाल

पुणे : स्टेडियम रिकामे असणे, पण तिकीटच न मिळणे ही क्रिकेट चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया आज (19 ऑक्टोबर) सुरु असलेल्या ‘भारत विरुद्ध बांग्लादेश’ या वर्ल्ड कप सामन्यावेळीही कायम आहे. ऑनलाईन तिकीटे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास तिकीटे सोल्ड असा मेसेज येत होता, पण त्याचवेळी स्टेडियममध्ये मात्र मॅच चालू होऊन तब्बल दीड तास झाला तरीही बहुतांश बाकडे रिकामेच असल्याचे दिसून येत आहे. (Cricket fans are angry after not getting tickets for India vs Bangladesh World Cup match)

https://twitter.com/PabloEs58765418/status/1714951137621856281

आयसीसी आणि बीसीसीआयने तिकीटांच्या विक्रीसाठी ‘बुक माय शो’ला करारबद्ध केले आहे. मात्र यापूर्वी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यांमध्ये हाच प्रकार पाहायला मिळाला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवार (8 ऑक्टोबर) चेन्नई येथे सामना पार पडला होता. रविवारी विद्यार्थ्यांना आणि अत्यावश्यक सेवा वगळून जवळपास सर्व कार्यालयांना सुट्टी असते. पण त्यानंतरही स्टेडियम अर्धेही भरलेले नव्हते, अशी तक्रार प्रेक्षकांनी केली होती.

या सगळ्यामुळे त्यामुळे तिकीट विक्रीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले होते. सोशल मीडियावरही लोक टीका करत होते. तिकीट विक्रीबाबत भारत-पाकिस्तान मॅचवेळी आणखी एक मुद्दा समोर आला होता. रविवारी, 8 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी 14 हजार तिकिटांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. 12 वाजताची वेळ दिली होती. त्याच वेळी लोकांनी ‘बुक माय शो’वर लॉग इन केले. पण प्रत्येकाला प्रतिक्षा यादीत टाकण्यात आले. कोणालाही तिकीट न मिळाल्याने सोशल मीडियावर लोक संतापले होते.

उद्घाटन सामन्यावेळीही चाहते झाले होते संतप्त :

विश्वचषक 2023 ची सुरुवात यंदा 5 ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात मोठे स्टेडियम मानले जाणाऱ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली, मागील स्पर्धेतील इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन अंतिम स्पर्धक पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. पण, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हे स्टेडियम रिकामे दिसले. स्टेडियम अर्धेही भरले नव्हते, त्यामुळे लोकांनी तिकीट वितरणावर प्रश्न उपस्थित केले होते.

Tags

follow us