सूर्याच्या वादळाचा तडाखा! तिसऱ्या सामन्यात विंडीजला नमवत टीम इंडियाचे कमबॅक

IND vs WI : पहिल्या दोन टी 20 सामन्यात सपाटून मार खाल्लेल्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात मात्र विजय मिळवत कमबॅक केले. या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या होत्या. या […]

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

IND vs WI : पहिल्या दोन टी 20 सामन्यात सपाटून मार खाल्लेल्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात मात्र विजय मिळवत कमबॅक केले. या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या होत्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करतानाही भारताची चांगलीच दमछाक झाली. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. यादवने चौफेर फटकेबाजी करत 44 चेंडूत 83 धावा केल्या. वेस्टइंडिजकडून ब्रेंडन किंगने 42 धावा केल्या. रोमेन पॉवेलने 40 धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने 28 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येक 1-1 विकेट घेतली.

तिसऱ्या T20 साठी टीम इंडियाच्या‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये बदल; यशस्वी जैस्वालचे पदार्पण

भारतीय संघाने विंडीजने दिलेले लक्ष्य 18 व्या ओव्हरमध्ये पार केले. भारताच्या तीन विकेट पडल्या होत्या. वनडे मालिका आणि पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर तिसऱ्या सामन्यात मात्र सूर्यकुमारने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी केली. त्याने तिलक वर्मासोबत 87 धावांची भागादारी केली. सूर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्माने सामना शेवटपर्यंत नेला. तिलक वर्माने 49 धावांची खेळी केली.

धोनी स्टाइल मारण्याच्या नादात हार्दिक ट्रोल

भारताला विजयासाठी दोन धावांची गरज होती. त्यावेळी कर्णधार हार्दिक पांड्याने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. पण, या कृत्यावरून आता हार्दिक पांड्या चांगलाच ट्रोल होत आहे. कारण, तिलक वर्माच्या 49 धावा झाल्या होत्या. त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एक रन करून तिलक वर्माला स्ट्राइक देणे गरजेचे होते. मात्र, त्याने तसे केले नाही. धोनीची स्टाइल मारण्याच्या मोहापायी तिलकचे अर्धशतक हुकवले.

Exit mobile version