Download App

टीम इंडियाचा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव; टी २० मध्ये सलग अकरावा विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळ करत आफ्रिकेचा पराभव केला.

Ind vs SA 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने (Team India) शानदार खेळ करत आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात भारताने ६१ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम (IND vs SA) फलंदाजी करत २०२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संपूर्ण संघ १४१ धावा करत ऑलआउट झाला. भारतीय संघाकडून संजू सॅमसनचे (Sanju Samson) शतक, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्तीची भेदक गोलंदाजीने विजयात मोलाचा वाटा उचलला. सॅमसनने १०७ धावा केल्या तर बिश्नोईने आणि चक्रवर्तीने तीन-तीन विकेट्स घेतल्या.

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या अभिषेक शर्माला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नंतर मात्र संजू सॅमसनने मात्र सलग दुसरे शतक करत इतिहास रचला. त्याने ५० चेंडूत १०७ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. संजू सॅमसनने सात चौकार आणि दहा षटकार लगावले. तिलक वर्माने १८ चेंडूत ३३ धावांची खेळी केली.

India VS South Africa: संजू सॅमसनने थेट इतिहास रचला ! टी-20 क्रिकेटमध्ये सलग दुसरे जबरदस्त शतक

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब राहिली. कप्तान अॅडम मार्करम फक्त ८ धावा काढून बाद झाला. संघाच्या ४४ धावा होईपर्यंत प्रमुख तीन फलंदाज बाद झाले होते. हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरने ४२ धावांची (David Miller) भागीदारी केली. नंतर वरुण चक्रवर्तीने एकाच ओव्हरमध्ये या दोन्ही फलंदाजांना बाद केले. पॅट्रिक क्रूगरसाठी दिवस खराब होता. खराब गोलंदाजीनंतर फलंदाजीतही फक्त एक रन करून बाद झाला.

भारतीय संघाने अखेरच्या पाच ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली नव्हती. परंतु, त्याची भरपाई गोलंदाजांनी केली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. ९३ धावा होईपर्यंत सात विकेट पडल्या होत्या. शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी १२५ धावा करायच्या होत्या. वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी भेदक गोलंदाजीमुळे भारताला विजय मिळवता आला. दोघांनी तीन-तीन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंहने एक विकेट घेत त्यांना साथ दिली.

चॅम्पियन्स ट्रॉफीत ट्विस्ट! हायब्रीड मॉडेलच्या अफवा, पाकिस्तान बोर्डाचा मोठा खुलासा

follow us