Download App

काय सांगता! फक्त 27 धावांवर विंडीज ऑलआउट, 129 वर्षांचं रेकॉर्डही मोडलं; ऑस्ट्रेलिया विजयी

वेस्टइंडिजचा संपूर्ण संघ फक्त 27 धावांवर ऑलआउट झाला. पंधराव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर वेस्टइंडिजचा अखेरचा फलंदाजही बाद झाला.

Lowest Score in Test Cricket : सबीना पार्क येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज (AUS vs WI) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल 129 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड तुटले. वेस्टइंडिजचा (West Indies) संपूर्ण संघ फक्त 27 धावांवर ऑलआउट झाला. पंधराव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर वेस्टइंडिजचा अखेरचा फलंदाजही बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मॅच आणि (Cricket Australia) सीरिजचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 225 धावा केल्या होत्या. वेस्टइंडिजचा पहिला डाव मात्र 143 धावांवरच संपुष्टात आला होता.

यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडिजच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज जास्त काळ टिकू शकले नाहीत. अवघ्या 121 धावांवर ऑलआउट झाला. वेस्टइंडिज पुढे माफक आव्हान होते. परंतु, येथेही विंडीजची साथ नशीबाने दिली नाही. वेस्टइंडिजला जिंकण्यासाठी 204 धावांची आवश्यकता होती. परंतु, दुसऱ्या डावात फलंदाजीत वेस्टइंडिजची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली.

शाब्बास टीम इंडिया! भारताच्या लेकींचा पराक्रम, वेस्टइंडिजचा ६० धावांनी पराभव

मिचेल स्टार्कची घातक गोलंदाजी

वेस्टइंडिजचे सात फलंदाज तर शू्न्यावरच बाद झाले. पहिल्या पाच फलंदाजांपैकी जॉन कॅम्पबेल, केवलन एल्स्टन अँडरसन, ब्रँडन किंग आणि रॉस्टन चेस हे चार फलंदाज शून्यावरच बाद झाले. स्टार्कने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. त्याने या डावात एकूण 6 विकेट घेतल्या. स्कॉट बोलँडने फक्त दोन ओव्हरमध्येच तीन फलंदाजांना बाद केले. जोश हेजलवूडने एक विकेट घेतली.

129 वर्षांपूर्वीचं रेकॉर्डही तुटलं

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 70 वर्षांत एक मोठी घटना घडली. एखादा संघ 30 धावांच्या आत ऑलआउट होण्याची ही वेळ पुन्हा आली आहे. वेस्टइंडिजच्या 27 धावांवर ऑलआउट डावाने 129 वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड मोडलं. कसोटी क्रिकेटमध्ये हा दुसरा सर्वात कमी धावांचा डाव होता. याआधी सन 1955 मध्ये न्यूझीलंडच्या नावावर असलेले रेकॉर्ड मात्र तुटले नाही. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला फक्त 26 धावांत ऑलआउट केलं होतं. कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात कमी स्कोअर मानला जातो.

याआधी 1955 मध्ये न्यूझीलंड संघ फक्त 26 धावांवर ऑलआउट झाला होता. यानंतर आता 2025 मध्ये वेस्टइंडिज 27 धावांवर ऑलआउट झाला. 1896 मध्ये इंग्लंड विरोधात दक्षिण आफ्रिकेचा संघ 30 धावांवर ऑलआउट झाला होता. 1924 मध्ये इंग्लंड विरुद्धच आफ्रिकेचा संघ 30 धावांवर ऑलआउट झाला होता. तसेच 1899 मध्ये इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात आफ्रिकेचा संघ फक्त 35 धावांत तंबूत परतला होता.

ENG vs WI : वनडेनंतर टी 20 तही विंडीजचा सुपडा साफ; इंग्लंडचा विजयी षटकार

follow us