AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दुसऱ्या टी 20 सामन्यात 13 धावांनी पराभूत केले. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेत मालिकाही खिशात टाकली आहे. आता तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियासाठी औपचारिकतेचाच राहिला आहे. शनिवारी सिडनीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने वीस ओव्हर्समध्ये 147 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 32 धावा केल्या. पाकिस्तानकडून हारिस रऊफने चार विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात पाकिस्तानने 19.4 ओव्हर्समध्ये सर्वबाद 134 धावा केल्या. उस्मान खानने 52 तर इरफान खानने 37 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जॉन्सनने पाच विकेट्स घेतल्या. जॉन्सनला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याआधी पहिल्या टी 20 सामन्यातही पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव झाला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट जॅक फ्रेजरच्या रुपात पडली. जॅक फक्त 20 धावा करुन बाद झाला. यानंतर कर्णधार जोश इंग्लिसला भोपळाही फोडता आला नाही. या दोघांना हारिस रऊफने बाद केले.
Champions Trophy : भारताने नकार देताच पाकिस्तानचा नवा फॉर्म्यूला; BCCI मंजूर करणार?
यानंतर मॅथ्यू शॉर्ट 32 धावा काढून बाद झाला. मार्कस स्टोइनिसही 14 धावा काढून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलही विशेष काही करू शकला नाही. मॅक्सवेल 21 धावांवर असताना सुफीयान मुकीमने त्याला बाद केले. टीम डेविडला हारिस रऊफने बाद केला. डेविड फक्त 18 धावा करू शकला. जेवियर बार्टलेट फक्त पाच धावांवर बाद झाला. हारिस रऊफने 22 धावा देत चार विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब राहिली. बाबर आझम फक्त तीन धावा करून बाद झाला. साहिबजादा फरहानही पाच धावा करून बाद झाला. कर्णधार रिजवान 16 तर आगा सलमान शून्यावर बाद झाला. यानंतरही पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाने हा सामना 13 धावांनी जिंकला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, टीम इंडियालाही मोठं सरप्राइज