ENG vs ZIM Test Match : इंग्लंडने झिम्बाब्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या (ENG vs ZIM) एकमेव कसोटी सामन्यात चमत्कारिक विजय (Test Cricket) मिळवला. ट्रेंटब्रिजच्या मैदानावर इंग्लंडच्या संघाने एक डाव आणि 45 धावांनी झिम्बाब्वेचा पराभव केला. फॉलोऑनसह खेळताना झिम्बाब्वेच्या संघाने दुसऱ्या डावात फक्त 255 धावा केल्या. पहिल्या डावातही झिम्बाब्वेला 265 धावा करता आल्या होत्या. याआधी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 565 धावा केल्या होत्या.
झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा फिरकीपटू शोएब स्पिनरने सहा विकेट्स घेतल्या. त्याने 18 ओव्हरमध्ये 81 धावा देत ही कामगिरी केली. त्याने चौथ्यांदा कसोटीत 4 विकेट्स घेतल्या. 22 वर्षांपेक्षा कमी वयात सर्वाधिक 5 विकेट्स घेणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. या सामन्यात शोएब बशीरने एकूण 9 विकेट्स घेतल्या. बशीरने मागील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर कसोटी सामन्यात पदार्पण केले होते.
Team India : सुदर्शन-अर्शदीपची एन्ट्री, नायर-ठाकूरचे पुनरागमन; सिलेक्शनमधील ५ मोठ्या गोष्टी
सामन्यातील पहिल्या डावात झिम्बाब्वेने शेवटच्या पाच विकेट फक्त 19 धावांत गमावल्या. दुसऱ्या डावात एका वेळी स्कोअर 4 बाद 207 असा होता. परंतु, पुढील 48 धावांत 6 खेळाडू बाद झाले. प्रमुख फलंदाज सीन विलियम्सने 88 धावा केल्या. सिकंदर रजाने 60 धावा केल्या. 2003 नंतर इंग्लंड आणि झिम्बाब्वेत हा पहिलाच कसोटी सामना होता. या सामन्यात झिम्बाब्वेला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. झॅक क्राउलेने 124, बेन डकेटने 140 तर ओली पोपने 171 धावांची खेळी केली. मधल्या फळीतील कर्णधारी हॅरी ब्रूकने 58 धावा केल्या. या फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने 565 धावांचा डोंगर उभा केला आणि डाव घोषित केला.