PAK vs ENG 1st Test : पाकिस्तान क्रिकेट संघावर लाजिरवाणा पराभव स्वीकारण्याची (PAK vs ENG) वेळ आली आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. इंग्लंडने 47 धावा आणि डाव राखून पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानच्या 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. पहिल्यांदाच असं घडलंय की एखादा संघाने पहिल्या इनिंगमध्ये 500 धावा केल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागला आहे.
कसोटीत एखाद्या संघाने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आणि तोच संघ पराभूत झाला असे कधीच घडलेलं नाही. मात्र मुल्तान कसोटीत हे रेकॉर्डही तुटलं. याबरोबरच पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात हा सर्वात मोठा लाजिरवाणा पराभव ठरला आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. परंतु दुसऱ्या डावात संपूर्ण संघ फक्त 220 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. त्यामुळे एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये नवे रेकॉर्ड : जो रुट, ब्रुकने पाकला फोडून काढले; इंग्लंडच्या एका डावात 823 धावा
पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. या दरम्यान शफीक, शान मसूद आणि आगा सलमान यांनी शतक केले. तर दुसरीकडे इंग्लंडनेही जबरदस्त फलंदाजी केली. कर्णधार हॅरी ब्रुकने तिहेरी शतक केले. ब्रुकने 29 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 317 धावा केल्या. जो रुटने द्विशतक केले. रुटने एकूण 262 धावा केल्या. या डावात इंग्लंडने 823 धावा करत डाव घोषित केला होता. या नंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना फक्त 220 धावाच करता आल्या.
पाकिस्तानकडून या सामन्यात सर्वाधिक शतक करण्यात आले. तरी देखील पराभव झाला. याआधी 1992 मध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलंबोत खेळल्या गेलेल्या सामन्यत 3 शतक झाले होते. तरी देखील या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला होता. पाकिस्ताने मुल्तान कसोटीत तीन शतक लगावले. तरी देखील सामना जिंकता आला नाही. याआधी 2022 मध्येही पाकिस्तानबाबतीत असंच घडलं होतं.
धावांचा पाऊस पाडणारे संघ
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेच्या नावावर सर्वात मोठा स्कोर आहे. 1997 भारताविरुद्ध श्रीलंकेने 952 धाव केल्या होत्या. पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये एेवढी मोठी धावसंख्या झाली होती. तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (1938) 7 विकेट्सच्या बदल्यात 903 धावा कुटल्या होत्या. तर हा सामना एेतिहासिक द ओव्हल मैदानात झाला होता. तर इंग्लंडने 1930 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 849 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पाकविरुद्ध 823 धावा करत चौथ्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजने पाकविरुद्ध 1958 मध्ये 790 धावा केल्या होत्या.
कांगारुंना धुतलं! चौथ्या वनडेत इंग्लंडचा दणदणीत विजय; ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव