Download App

मोठी बातमी! पाकिस्तानात आणखी एक आयसीसी टूर्नामेंट; वेळापत्रकही जाहीर

आयसीसीने महिला वनडे वर्ल्डकप क्वालिफायरच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील क्रिकेट सामने लाहोर शहरातील दोन मैदानांवर होतील.

ICC Women’s World Cup Qualifier Schedule : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा (Champions Trophy 2025) नुकत्याच पार पडल्या. यानंतर आणखी एक आयसीसी टूर्नामेंट (ICC Tournament) पुढील महिन्यात पाकिस्तानात होणार (Pakistan Cricket) आहे. आयसीसीने महिला वनडे वर्ल्डकप क्वालिफायरच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील क्रिकेट सामने लाहोर शहरातील (Lahore) दोन मैदानांवर होतील. पहिला सामना 9 एप्रिल रोजी होईल तर अंतिम सामना 19 एप्रिलला होईल.

टीम इंडिया चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद

या स्पर्धेत एकूण सहा क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. यातील दोन संघांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या मुख्य स्पर्धेसठी क्वालिफाय करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि यजमान भारताने (Team India) आयसीसी महिला चॅम्पियनशीपसाठी टॉप 6 मध्ये जागा पक्की करत वर्ल्डकपसाठी क्वालिफाय केले आहे.

महिला एकदिवसीय क्वालिफायरमध्ये बांग्लादेश, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्टइंडिज असोसिएट देश स्कॉटलंड आणि थायलंड यांच्याशी स्पर्धा करतील. या टूर्नामेंटमध्ये एकूण 15 सामने होतील. बांग्लादेश, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्टइंडिज आयसीसी महिला चॅम्पियनशीपमध्ये सातव्या ते दहाव्या क्रमांकावर राहिल्याने क्वालिफायरमध्ये पोहोचले आहेत. थायलंड आणि स्कॉटलंडने 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत आयसीसी महिला एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये पुढील दोन क्रमांक मिळवत या टूर्नामेंटमध्ये एन्ट्री पक्की केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी गमावल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटमध्ये भूकंप, कर्णधारासह ‘हे’ 8 खेळाडू बाहेर

आयसीसी महिला वर्ल्डकप क्वालिफायर शेड्यूल

9 एप्रिल : पाकिस्तान वि. आयर्लंड
10 एप्रिल : थायलंड वि. बांग्लादेश
11 एप्रिल : पाकिस्तान वि. स्कॉटलंड
13 एप्रिल : स्कॉटलंड वि. थायलंड
14 एप्रिल : पाकिस्तान वि. वेस्टइंडिज
15 एप्रिल : थायलंड वि. आयर्लंड
17 एप्रिल : बांग्लादेश वि. वेस्टइंडिज
18 एप्रिल : आयर्लंड वि. स्कॉटलंड
19 एप्रिल : पाकिस्तान वि. बांग्लादेश

follow us