IND vs PAK : वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स (WCL) स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला होता. दोन्ही देशांतील सध्याची परिस्थिती पाहता भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे WCL ला सामना रद्द करून भारतीय क्रिकेट चाहत्यांची माफी मागावी लागली होती. या निर्णयानंतर पाकिस्तान मात्र चांगलाच चवताळला आहे. पाकिस्तान भारताबरोबर सामन्याचे अंक (Points) शेअर करण्यास तयार नाही. भारताने खेळण्यास नकार दिल्याने सामना रद्द करावा लागला असे उत्तर पाकिस्तानने दिलं आहे.
या सामन्यासंदर्भात WCL ने एक निवेदन प्रसिद्धीस दिले होते. त्यात सामना रद्द झाल्याची माहिती देण्यात आली होती. भारताच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले होते.
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) हेच यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले गेले. या हल्ल्यात अतिरेक्यांनी फक्त हिंदू धर्मियांना त्यांची धार्मिक ओळख विचारुन गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्यानंत दोन्ही देशांत राजनयिक संबंध आणखी खराब झाले आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत पाकिस्तानचा विरोध केला जात आहे.
New Zealand VS Pakistan: पाक संघ पुन्हा तोंडावर आपटला ! टी-20 मालिका न्यूझीलंडने सहज जिंकली
WCL च्या सूत्रांनी ANI ला सांगितले की आम्ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला सांगितले आहे की सामन्याचे आयोजन करण्यात आम्ही असमर्थ होतो. यात भारताची काहीच चूक नाही. दुसरीकडे पाकिस्तान चॅम्पियन्स टीमचे म्हणणे आहे की भारतानेच या सामन्यातून माघार घेतली आहे आम्ही नाही. त्यामुळेच आता आम्ही सामन्याचे अंक शेअर करू इच्छित नाही.
सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्यासह अन्य भारतीय खेळाडू्ंनी पाकिस्तान विरुद्ध खेळणार नसल्याचे सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की भारतीय संघातील अन्य खेळाडूंनीही हाच निर्णय घेतला आहे. शिखर धवनने तर सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. तसेच स्पर्धेच्या आयोजकांना एक ईमेल देखील पाठवला होता. यात त्याने पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. हा निर्णय मी 11 मे रोजीच घेतल्याचे धवनने सांगितले होते. जो निर्णय 11 मे रोजी घेतला त्यावर मी आजही कायम आहे. माझा देश माझ्यासाठी सर्वकाही आहे. देशापेक्षा मोठं दुसरं काहीही नाही असे धवनने या पोस्टमध्ये म्हटले होते.