Download App

कधी सुरू झाला LBW नियम? आऊट होणारा पाहिला खेळाडू कोण? जाणून घ्या, खास हिस्ट्री…

एलबीडब्ल्यूचा नियम नेमका आहे तरी काय? हा नियम कसे काम करतो? याची उत्तरं बहुतेकांना माहीत नाहीत.

LBW in Cricket : क्रिकेटमध्ये फलंदाज एलबीडब्ल्यू आऊट होतो हे आपल्याला माहिती (LBW in Cricket) आहे. क्रिकेटमधील हा एक नियम (Cricket News) आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. मैदानावरील अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिलं की फलंदाज तंबूत परततो. हे सुद्धा आपल्याला ठाऊक आहे. पण हा एलबीडब्ल्यूचा नियम नेमका आहे तरी काय? हा नियम कसे काम करतो? याची उत्तरं बहुतेकांना माहीत नाहीत. चला तर मग आज याच एलबीडब्ल्यू नियमाची माहिती घेऊ या..

क्रिकेट जुना खेळ आहे. या खेळात वेळेनुसार अनेक बदलही झाले आहेत. या खेळात LBW चाही एक नियम आहे ज्याला लेग बिफोर विकेट असेही म्हटले जाते. आता हा नियम काय आहे? या नियमाच्या आधारावर अंपायर एखाद्या फलंदाजाला कसे आऊट देतात? हे समजणं फार कठीण काम आहे. जर फलंदाजांच्या शरीरावर चेंडू आदळला आणि त्यावेळेस जर फलंदाज विकेटच्या समोर उभा असेल तर त्याला आऊटच दिले पाहिजे असे नाही.

LBW चा नियम कधी सुरू झाला?

अठराव्या शतकात फलंदाज आऊट होण्यापासून वाचण्यासाठी पायांना पॅड बांधण्यास सुरुवात करू लागले होते. याचे चलन जास्त वाढत चालल्याने 1774 मध्ये यासाठी नियम तयार करण्यात आला. या नियमानुसार जर फलंदाज विकेटसमोर असताना चेंडू त्याच्या पॅडला आदळला तर फलंदाजाला आऊट दिले जात होते. कालांतराने या नियमात सुधारणा होत राहिल्या. परंतु 1935 मध्ये या नियमात काही नव्या गोष्टी जोडण्यात आल्या. या नव्या नियमानुसार जर चेंडू ऑफ स्टम्प लाईनच्या बाहेर पडला त्यावेळी जर फलंदाज स्टंपसमोर आढळून आला तर त्याला आऊट दिले जाते.

Jay Shah : गुजरात क्रिकेट ते ICC चा तरुण अध्यक्ष; जय शाहांची मैदानाबाहेरची खास स्टोरी..

अशावेळी लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचे समर्थन करणाऱ्या लोकांनी या नियमाला कडाडून विरोध केला. अनेक दशके विरोध केल्यानंतर 1972 मध्ये नवीन तरतूद करण्यात आली. यानुसार एखाद्या फलंदाजाने शॉट न खेळण्याच्या उद्देशाने आपली बॅट मागेच ठेवलेली असेल त्याचवेळी जर चेंडू लेग स्टंप लाईनबाहेर टप्पा खाल्ला असेल अशावेळी सुद्धा फलंदाजाला आऊट दिले जाते. परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार जर फलंदाज क्रिजपासून तीन मीटर किंवा पुढे निघून आला असेल त्यावेळी जर चेंडू पॅड किंवा शरीरावर आदळला असेल तर आऊट दिले जात नाही.

LBW आऊट होणार पाहिला खेळाडू कोण

या नियमानुसार आऊट होणारा क्रिकेट विश्वातील पाहिला फलंदाज हॅरी कॉर्नर होता. सन 1900 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये (Olympic Games) इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात (ENG vs France) क्रिकेट सामना होत होता. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज कॉर्नरला फ्रान्सचा गोलंदाज डब्ल्यू अँडरसनने आऊट केले होते. या नियमानुसार आऊट होणारे पहिले भारतीय खेळाडू नाओमल जियोमल होते. त्यांना सन 1932 मध्ये इंग्लंडच्या वॉल्टर रॉबिन्सने आऊट केले होते.

Team India: टीम इंडियामध्ये 125 कोटींची झाली वाटणी; कोणाला किती पैसे मिळाले?

follow us