Download App

न्यूझीलंडच्या खेळाडूचा अजब निर्णय, अचानक टीमच बदलली; आता ‘या’ देशाकडून करणार बॅटिंग

टॉम ब्रूस आता न्यूझीलंडचा माजी खेळाडू झाला आहे. पण त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही तर क्रिकेट टीमच बदलली आहे.

New Zealand Player Change Team : टॉम ब्रूस आता न्यूझीलंडचा माजी खेळाडू झाला (Tom Bruce) आहे. पण त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही तर क्रिकेट टीमच बदलली आहे. म्हणजेच टॉम ब्रूस आता स्कॉटलंडकडून खेळताना दिसणार आहे. क्रिकेट स्कॉटलंडने या खेळाडूला आयसीसी वर्ल्डकप लीग 2 सीरिजसाठी आपल्या स्क्वाडमध्ये समाविष्ट केले आहे. ही टूर्नामेंट कॅनडात आयोजित करण्यात आली आहे. टॉम ब्रूसच्या एन्ट्रीने स्कॉटलंड क्रिकेट बोर्ड उत्साहीत दिसत आहे.

टॉम ब्रुसने का घेतला निर्णय

टॉम ब्रुसने न्यूझीलंडसाठी 2017 ते 2020 या काळात 17 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने 279 धावा केल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तर ब्रुसने तिहेरी शतक केले आहे. न्यूझीलंडसाठी ब्रुसने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 93 सामन्यांत 6 हजार 267 धावा केल्या आहेत. यात त्याचा 345 धावा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीममध्ये येण्याआधी टॉम स्कॉटलंड डेव्हलपमेंट टीममध्ये होता.

स्कॉटलंड टीममध्ये सहभगी होण्याच्या निर्णयावर बोलताना टॉम म्हणाला, माझ्या कुटुंबाचे स्कॉटीश संघाशी कनेक्शन आहे. ज्यावेळी त्यांना माहिती होईल की मी या देशाकडून खेळतोय तेव्हा माझ्या कुटुंबाला नक्कीच आनंद होईल. मला पाच वर्षांसाठी न्यूझीलंडसाठी खेळण्याची संधी मिळाली होती. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्कॉटलंडसाठी यश मिळवू इच्छितो असे टॉम ब्रुस यांनी सांगितले.

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, 202 धावांनी वेस्टइंडिजने लोळवलं; मालिकाही जिंकली

मी सन 2016 मध्ये काही काळासाठी या टीममध्ये होतो. त्यावेळचा अनुभव चांगलाच होता. मी या संघातील खेळाडू्ंसोबत आणि त्यांच्या विरुद्धही खेळलो आहे. मी या सगळ्यांचं यश पाहून आनंदी आहे. आता मी पुन्हा या संघाचा घटक होतोय याचा मला आनंद आहे असे टॉम ब्रुसने सांगितले. दरम्यान, टॉम ब्रुसने घेतलेल्या या निर्णयाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

follow us