न्यूझीलंडचा पराक्रम! पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव; कमबॅकचे प्रयत्न अपयशी

बंगळुरूत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

New Zeland 2

New Zeland 2

IND vs NZ Test Match : बंगळुरूत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs NZ) टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा (Team India) लागला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चिवट प्रतिकार केला. सामना जिंकण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु, यश आलं नाही. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ फक्त 46 धावांवर ऑल आऊट झाला होता. यानंतरही दुसऱ्या डावात भारताने 356 धावांची आघाडी पार करत 462 धावा केल्या. न्यूझीलंडसमोर 107 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडकडे पूर्ण एक दिवस होता. यानंतर दोन विकेट गमावत न्यूझीलंडने हा सामना जिंकला.

जॉबची ऑफर आली अन् पठ्ठ्यानं क्रिकेटच सोडलं; 16 हजारी फलंदाजाचा क्रिकेटला गुडबाय..

या विजयासह न्यूझीलंडने इतिहास रचला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारतातील न्यूझीलंडचा हा तिसरा विजय होता. याआधी 1988 मध्ये न्यूझीलंडने भारतात कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर आज थेट 36 वर्षांनी पुन्हा अशी कामगिरी न्यूझीलंडने करून दाखवली.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या. विलियम ओ रुरकेने पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात तीन फलंदाजांना आऊट केले. रचिन रविंद्रने पहिल्या डावात 132 धावा करून त्याच्या क्रिकेट करियरमधील दुसरे शतक झळकावले. दुसऱ्या डावातही तो नाबाद राहिला. सातत्याने धावा करत राहिल्याने संघावर कोणतेही दडपण आलं नाही.

असा पलटला सामना

कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी पाऊस झाल्याने एकही चेंडू टाकता आला नाही. दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय अपयशी ठरला. ओव्हरकास्ट कंडिशनमध्ये न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. भारताचा अख्खा संघ फक्त 46 धावांत ऑल आऊट झाला. पाच फलंदाजांना तर खाते सुद्धा उघडता आलं नाही.

यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने एकूण 402 धावा केल्या. अशा प्रकारे भारतीय संघावर 356 धावांची आघाडी घेतली. आता दुसऱ्या डावात ही आघाडी पार करून मोठं आव्हान द्यावं लागणार होतं. यावेळी मात्र भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. परंतु यावेळी मॅट हेनरी आणि विलियम ओ रुरके या दोघांनी तीन-तीन विकेट घेत सामन्याचं चित्रच पालटून टाकलं.

Exit mobile version