जॉबची ऑफर आली अन् पठ्ठ्यानं क्रिकेटच सोडलं; 16 हजारी फलंदाजाचा क्रिकेटला गुडबाय..
George Worker Retirement : न्युझीलंडचा फलंदाज जॉर्ज वर्करने अचानक क्रिकेटमधून (George Worker Retirement) निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. वर्कर सध्या 34 वर्षांचा असून त्याने संघासाठी फक्त 12 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वर्करची कामगिरी सुद्धा चांगली राहिली तरी देखील फक्त 12 सामन्यांवरच त्याचे क्रिकेट करियर थांबले आहे. न्यूझीलंडचा (Newzeland Cricket) धडाकेबाज फलंदाज जॉर्ज वर्करने निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या खेळाडूने न्युझीलंड साठी 10 एकदिवसीय आणि दोन टी 20 सामने खेळले आहेत. वर्करने त्याच्या या लहानशा करियरमध्ये चार अर्धशतके देखील झळकावली आहेत. क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करूनही त्याचे करियर फार लवकर संपुष्टात आले.
आता असं काय झालं की वर्करने अचानक क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा केली. तर यामागच कारण देखील आश्चर्यकारक असेच आहे. वर्करला एका गुंतवणूक संस्थेत चांगल्या पगाराची जॉब ऑफर मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार जॉर्ज वर्कर आता या कंपनीत जॉबला सुरुवात करणार आहे.
विंडीजचा सुपर विजय! पराभवामुळे न्यूझीलंडचं सुपर 8 चं गणित बिघडलं
जोर्जने निवृत्ती जाहीर करताना सांगितले की आता मी माझ्या सतरा वर्षांच्या व्यावसायिक क्रिकेट (Cricket News) करियरला पूर्णविराम देत आहे. मी आता नवीन करिअरला सुरुवात करत आहे. वर्करच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं म्हटलं तर या खेळाडूला सन 2015 मध्ये पहिल्यांदा टी 20 सामन्यात संधी मिळाली होती. यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यात सुद्धा संधी मिळाली. पण 2018 साल येता येता त्याच्या करिअरला ब्रेक लागला.
न्युझीलंड संघातील टॅलेंट खेळाडूंपैकी जॉर्ज वर्कर हा एक खेळाडू होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याचे रेकॉर्ड फारसे चांगले राहिले नाही मात्र एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी शानदार अशीच राहिली. डाव्या हाताच्या या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 126 सामने खेळले. यामध्ये त्याने 11 शतके झळकावत एकूण 6400 रन केले. या व्यतिरिक्त वर्करने 160 लिस्ट ए सामन्यांमध्ये 6721 रन केले यात 18 शतकांचा समावेश आहे. टी 20 सामन्यातही त्याने चांगली फलंदाजी केली. प्रथम श्रेणी मधील एकूण 154 टी 20 सामन्यांमध्ये 3480 रन वर्करने केले. यात एका शतकाचाही समावेश आहे. अशा प्रकारे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये जॉर्ज वर्करने 30 शतकांसह 16 हजरांपेक्षा जास्त रन केले.
भारत-न्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेत सेमीफायनलचे युद्ध : फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?