Download App

पाकिस्तानचा नवा ड्रामा! भारतात येण्याआधीच घाबरला, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

IND vs PAK World Cup : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानने आता एक नवा ड्रामा सुरू केला आहे. भारतातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी एक सुरक्षा पथक भारतात पाठविण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. याआधी भारतात संघ पाठवायचा की नाही यावर विचार करू असे पाकिस्तानने म्हटले होते. यानंतर पाकिस्तानला झटका देत आयसीसीने स्पष्ट शब्दांत सांगितले होते की पीसीबीने करार केला आहे त्यामुळे आता मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही.

येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धांना सुरुवात होत आहे. याआधी भारतात ज्या ठिकाणी सामने होणार आहेत तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी एक पथक पाठविण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. पीसीबीच्य नवीन अध्यक्षांची नियुक्ती केल्यानंतर पाकिस्तान सरकार याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, भारत सरकार याल मंजुरी देणार की नाही याबाबत काहीच निश्चित नाही.

Diamond League 2023 : नीरज चोप्रानं रचला पुन्हा इतिहास! ‘लॉसने डायमंड लीग’वर कोरलं भारताचं नाव

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी पाकिस्तानचे सामने होणार आहेत तेथे पाकिस्तानचे सुरक्षा पथक पाहणी करणार आहे. प्रतिनिधीमंडळ 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादसह चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकोता दौरा करणार आहे.

प्रतिनिधीमंडळ येथील अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहे. सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली जाणार आहे. जर कोणत्याही ठिकाणाबाबत काही शंका आली तर पीसीबी आयसीसी आणि बीसीसीआयला अहवाल सादर करील. मागील वेळी पाकिस्तानचा संघ टी 20 विश्वकप स्पर्धेसाठी भारतात आला होता त्यावेळी संयुक्त पथक भारतात पाठविण्यात आले होते. या पथकाच्या शिफारशीनंतरच धर्मशाळा येथे होणारा भारत पाकिस्तान सामना कोलकाता येथे स्थानांतरीत करण्यात आला होता.

टीम इंडियाच्या जर्सीवरुन बायजूस गायब, आता ‘ही’ कंपनी असेल प्रायोजक

Tags

follow us