Champions Trophy Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी अब्जावधी (Champions Trophy) रुपये पाकिस्तानने खर्च केले. पाकिस्तानमध्येच स्पर्धा होत असल्याने यंदा टीम चांगली कामगिरी करील असा विश्वास प्रत्येकालाच होता. पण दुर्दैवच म्हणायचे की पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच गारद झाला. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पराभव (Team India) केला. त्यामुळे पाकिस्तानी टीम आता या स्पर्धेतूनच बाद झाली आहे.
तसे पाहिले तर तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानात आयसीसी स्पर्धा (ICC Champions Trophy) भरवण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय्यत (Pakistan Cricket Board) तयारी केली आहे. परंतु त्यांचा संघ साखळी फेरीतच गारद झाला आहे.
सेमी फायनल मध्ये काही प्रवेश करता आला नाही. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने तब्बल 1800 कोटी रुपये खर्च केले पण त्यांच्या टीमने फक्त 16 तासांतच शरणागती पत्करली. साखळी फेरीतील तिसरा सामना पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात होणार (Pakistan vs Bangladesh) होता. परंतु पाऊस आल्याने हा सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा शेवटचा सामना होता. आणि या दोन्ही टीम एकही मॅच न जिंकता स्पर्धेतून बाद झाल्या. पण हा सामना फक्त औपचारिकता होता कारण दोन्ही संघ याआधीच स्पर्धेतून बाद झाले होते.
रचिन रवींद्रची शतकी खेळी, बांगलादेशचा पराभव अन् पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आऊट
पाकिस्तान या स्पर्धेचा आयोजक आहे. घरच्या मैदानावर सामने होत असल्याने पाकिस्तानसाठी जमेची बाजू होती. स्पर्धेत विजेतेपद मिळेल अशीही शक्यता काही क्रिकेट तज्ञांनी व्यक्त केली होती. सन 1996 नंतर प्रथमच इतकी मोठी जागतिक पातळीवरील स्पर्धा देशात होत आहे ही मोठी गोष्ट होती. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेटने मोठा खर्च केला. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान बोर्डाने सामन्यांची तीन ठिकाणे रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथील मैदानाचे नूतनीकरण करण्यासाठी तब्बल 1800 कोटी पाकिस्तानी रुपये म्हणजेच 560.93 कोटी भारतीय रुपये खर्च केले.
कोट्यवधी रुपये खर्च करून स्टेडियमचा चेहरामोहरा बदलण्यात आला. पण पाकिस्तानी संघाचे प्रदर्शन अतिशय खराब राहिले. फक्त 16 तासांतच टीमचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जवळपास आठ तासांच्या आत पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पराभव केला. नंतर पुढील आठ तासांत टीम इंडियाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मैदाने सुधारण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला पण क्रिकेट टीम सुधारण्यासाठी काहीच केले नाही असेच आता म्हणावे लागेल.
टीम इंडियातील ‘या’ चार खेळाडूंचा लवकरच फैसला; माजी प्रशिक्षकाने नेमकं काय सांगितलं?