टीम इंडियातील ‘या’ चार खेळाडूंचा लवकरच फैसला; माजी प्रशिक्षकाने नेमकं काय सांगितलं?

टीम इंडियातील ‘या’ चार खेळाडूंचा लवकरच फैसला; माजी प्रशिक्षकाने नेमकं काय सांगितलं?

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धांना सुरुवात झाली आहे. बांग्लादेश विरोधात दुबईत शानदार प्रदर्शन करत टीम इंडियाने विजयी घोडदौड सुरू केली आहे. टीम इंडियाच्या या विजयात युवा खेळाडू शुभमन गिलसह वेगवान गोलंदाज शमीचे खास योगदान राहीले. गिलने दबावात असतानाही 101 धावांची नाबाद खेळी केली. तर शमीने जोरदार कमबॅक करत 5 विकेट्स घेतल्या. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी 41-41 धावा केल्या. या दमदार प्रदर्शनानंतरही काही खेळाडूंचे भवितव्य धोक्यात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी या खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली असून मुख्य कोच गौतम गंभीरला खास आवाहन केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्याआधी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यावर प्रश्न विचारले जात होते. कारण त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. शमी सुद्धा दुखापतीमुळे संघाबाहेर होता. या सर्व गोष्टींचा विचार करता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी क्रिकेट संघाच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळाला किंवा पराभव झाला तरी गौतम गंभीरने काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.

टीम इंडियाने खरंच चीटिंग केली? हर्षितच्या Concussion सब्सटीट्यूटचा वाद चिघळला; काय आहे नियम..

कोचसाठी ही एक महत्वाची स्पर्धा आहे. त्यांना आता वरिष्ठ आणि युवा खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या बदलांचा विचार करून कठोर निर्णय घ्यावे लागतील. या बदलांना प्रत्यक्षात कसे उतरवता येईल याचा विचार गंभीरला करावा लागेल. पण अशा पद्धतीचे कठोर निर्णय घेण्याचे काम प्रशिक्षकाचेच आहे. अनिल कुंबळेनुसार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि शमीच्या भवितव्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी निर्णायक ठरणार आहे. संघात कशा पद्धतीचे बदल होतील आणि वरिष्ठ खेळाडूंचे काय होईल याचे उत्तर या स्पर्धेतून मिळणार आहे. जिंकले किंवा पराभव झाला तरीही आता लवकरात लवकर कठोर निर्णय घ्यावे लागतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube