टीम इंडियाने खरंच चीटिंग केली? हर्षितच्या Concussion सब्सटीट्यूटचा वाद चिघळला; काय आहे नियम..

टीम इंडियाने खरंच चीटिंग केली? हर्षितच्या Concussion सब्सटीट्यूटचा वाद चिघळला; काय आहे नियम..

Harshit Rana Concussion Substitute Controversy : टीम इंडियाने चौथ्या टी 20 सामन्यात (Team India) इंग्लंडचा 15 धावांनी पराभव करत मालिका विजय साकारला. या मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी आघाडी (IND vs ENG) घेतली आहे. भारताच्या विजयात हर्षित राणाचे (Harshit Rana) योगदान राहिले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने जबरदस्त कामगिरी करत तीन विकेट घेतल्या. परंतु, टीम इंडियाच्या या विजयाला ग्रहण लागलं आहे. सोशल मीडियावर भारतीय संघावर टीका होत असून विश्वासघाताचे आरोप होऊ लागले आहेत. चला तर मग जाणून घेऊ की या सामन्यात असं काय घडलं होतं. आयसीसीचा कन्कशन सब्सटीट्यूट नियम काय आहे..

कन्कशन सब्सटीट्यूट नियम काय

एखाद्या कन्कशनच्या परिस्थितीत खेळाडूला बदलण्याची गरज निर्माण होते त्यावेळी या नियमाचा आधार घेतला जातो. या नियमानुसार ज्यावेळी लाइक फॉर लाइक रिप्लेसमेंट असेल त्याचवेळी सामनाधिकारी एखाद्या संघाची खेळाडू बदलाची मागणी स्वीकारू शकतो. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जर एखादा फलंदाज दुखापतग्रस्त झाला असेल त्याच्या जागी दुसरा एखादा फलंदाज घेता येईल. याच पद्धतीने गोलंदाजाच्या बदल्यात गोलंदाजच घेता येईल. ज्या खेळाडूचा संघाला जास्त फायदा होणार नाही असाच खेळाडू रिप्लेस करता येऊ शकेल असा या नियमाचा ढोबळ अर्थ आहे.

पुण्यात राणा-बिश्नोई चमकले, इंग्लंडचा 15 धावांनी पराभव करत मालिका जिंकली

नियमानुसार सामनाधिकारी अशाच परिस्थितीत कन्कशन रिप्लेसमेंटला मंजुरी देऊ शकतात ज्यावेळी एखाद्या खेळाडूचे डोके किंवा मानेच्या आसपास दुखापत झाली असेल. रिप्लेसमेंट मेडिकल टीमद्वारे तपासणी केल्यानंतरच लागू करता येईल. जर एखाद्या संघाला रिप्लेसमेंट पाहिजे असेल तर त्यासाठी आधी सामनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल.

टीम इंडियावर आरोप

भारतीय संघावर सोशल मिडियावर आरोप होत आहेत. एक व्यक्ती म्हणाला ऑलराउंडच्या जागी ऑलराउंडरच घेता येईल. शिवम दुबे ऑलराउंडर आहे. त्यामुळे दुबेऐवजी फूल टाइम गोलंदाज हर्षित राणाला घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही जणांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर चीटिंग (Gautam Gambhir) केल्याचा आरोप केला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने एक्सवर लिहीले अर्धवेळ गोलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची जागा वेगवान गोलंदाज कशी घेऊ शकतो? अॅलिस्टर कुक म्हणाला शिवम दुबेच्या (Shivam Dubey) जागी हर्षित राणाला कन्कशन सब्सटीट्यूट म्हणून परवानगी कशी दिली हे मला समजत नाही.

शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे. टी 20 वर्ल्डकप सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये होता. या काळात त्याने अमेरिके विरूद्धच्या सामन्यात एक ओव्हरही टाकली होती. आयपीएल 2024 च्या 14 सामन्यांत त्याला एक ओव्हर मिळाली होती. हर्षित राणाच्या नावावर आतापर्यंत 25 टी 20 सामन्यांत फक्त दोन धावा आहेत. या काळात त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत. दुबेने 153 सामन्यांच्या टी 20 कारकि‍र्दीत 191 ओव्हर टाकल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube