IND vs BAN : टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यातील नियोजित बांग्लादेश दौरा (IND vs BAN) रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बांग्लादेशात सत्तापालट (Bangladesh Crisis) झाल्यापासून परिस्थिती अतिशय भयावह बनली आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करता या दौऱ्याला भारत सरकारची (Indian Government) मंजुरी मिळणे कठीण दिसत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (Bangladesh Cricket Board) यावर लवकरच अंतिम निर्णय घेऊ शकतात.
बांग्लादेशात ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार (Sheikh Hasina) हटवण्यात आलं होतं. यावेळी देशात मोठा हिंसाचार उफाळून आला होता. येथील हिंदू धर्मियांवर कट्टरवाद्यांकडून हल्ले करण्यात आले होते. हे हल्ले अजूनही कमी जास्त प्रमाणात सुरुच आहेत. देशात राजकीय अस्थिरता आणि हिंसक प्रदर्शनांचं वातावरण आहे. अशात केंद्र सरकार खेळाडूंच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की दौरा रद्द करण्याऐवजी (India vs Bangladesh) स्थगित करण्यावर सहमती होऊ शकते. बोर्डाने या दौऱ्यासाठी मीडियी राइट्सचे बिडिंग देखील टाळले आहे. यातून हा दौरा स्थगित होईल याचे संकेत मिळत आहेत.
टीम इंडियाचं बॅडलक! दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा विजय; शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकला
या दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ 17 ऑगस्टपासून (Team India) ढाकात तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा दौरा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांच्या (Virat Kohli) वनडे क्रिकेटमधील वापसीच्या दृष्टीनेही खास होता. कारण या दोघांनीही कसोटी आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले की बीसीसीआयबरोबर (BCCI) चर्चा सकारात्मकपणे सुरू आहे. या दौऱ्यासाठी भारत सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. जर दौरा ऑगस्टमध्ये झाला नाही तर भविष्यात अन्य वेळी आयोजित करण्यावर विचार केला जाऊ शकतो.
दरम्यान, या दौऱ्यासंदर्भात बीसीसीआयने (BCCI) अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. पुढील आठवड्यापर्यंत याबाबत स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जर दौरा स्थगित किंवा रद्द झाला तर रोहित आणि विराटच्या चाहत्यांना त्यांना मैदानात पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.
Virat Kohli ने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ खास विक्रम