Download App

टीम इंडिया जिंकली पण ‘त्या’ एकाच कृतीने हार्दिक ठरला स्वार्थी; नेटकरीही भडकले

WI vs IND 3rd T20 : वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात उत्तुंग षटकार खेचर टीम इंडियाला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्याच सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्याची एक कृतीच त्याला टीकेचा धनी बनवून गेली आहे.

टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो असा होता. कर्णधार हार्दिक पांड्यान धोनी स्टाईलने सिक्सर मारत विजय मिळवून दिला. मात्र या विजयानंतर त्याला आता प्रचंड ट्रोल्सचा सामना करावा लागत आहे. सामन्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं. तू महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना आदर्श मानतोस अन् असं करतोस.. अशी टीका त्याच्यावर अनेकांनी केली आहे.

तिसऱ्या T20 साठी टीम इंडियाच्या‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये बदल; यशस्वी जैस्वालचे पदार्पण

हार्दिकवर नेटकऱ्यांनी राग व्यक्त करण्याचे कारणही तसेच आहे. या सामन्यात संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. विजयासाठी 160 धावांचे टार्गेट होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला संघाला मोठे धक्के बसले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी यशस्वी फलंदाजी करत 87 धावांची भागीदारी रचली.

सूर्यकुमार यादव 83 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या मैदानावर आला. त्याने शेवटच्या काही ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी केली. तिलक वर्मा त्याच्या साथीला होता. त्याला त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एक रनची गरज होती. दुसरीकडे पांड्या स्ट्राइकवर होता. त्याने मात्र या गोष्टीचा विचार न करता षटकार खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पांड्याची हीच कृती फॅन्सना आवडली नाही. नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. हार्दिकच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर #Selfish ट्रेंड होता.

या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या होत्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करतानाही भारताची चांगलीच दमछाक झाली. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. यादवने चौफेर फटकेबाजी करत 44 चेंडूत 83 धावा केल्या. वेस्टइंडिजकडून ब्रेंडन किंगने 42 धावा केल्या. रोमेन पॉवेलने 40 धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने 28 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येक 1-1 विकेट घेतली.

Tags

follow us