WI vs PAK 2nd T20 : वेस्टइंडिज क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानला पराभवाची (WI vs PAK) धूळ चारली. या थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस निर्माण झाली होती. शाहीन शाह अफ्रिदीने शेवटची ओव्हर टाकली. या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर (Pakistan vs West Indies) जेसन होल्डरने चौकार लगावत टीमला विजय मिळवून दिला. होल्डरने गोलंदाजीतही चुणूक दाखवली. चार विकेट्स घेत त्याने ड्वेन ब्राव्होचे रेकॉर्ड मोडले. तीन सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक होणार आहे.
या सामन्यात पाकिस्तानने विंडीजला 134 धावांचे लक्ष्य दिले होते. विंडीजची सुरुवात खराब राहिली. एलिक एथनाज (2) आणि ज्वेल अँड्र्यू (12) दोन्ही सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले. यानंतर कर्णधार शाय होप (21) सुद्धा लवकर बाद झाला. गुडाकेश मोती (28) नंतर जेसन होल्डर आणि रोमारिया शेफर्ड या दोघांनी संघाला विजय मिळवून दिला.
फुलराणी सायना – पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र; घटस्फोटाच्या निर्णयानंतर 20 दिवसांतच घेतला यु टर्न
शाहीन शाह अफरीदीच्या शेववटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज होती. दुसऱ्याच चेंडूवर अफरीदीने रोमारियो शेफर्डला (15) बाद करून मॅच पाकिस्तानच्या बाजूने फिरवली. शेवटच्या चेंडूवर विंडीजला चार धावांची गरज होती. एक किंवा दोन रन काढून काहीच उपयोग नव्हता. चौकार मारल्याशिवाय पर्याय नव्हता. यातच अफरीदीने वाईड बॉल टाकला. त्याचा एक रन मिळाला. आता एका चेंडूवर तीन धावा हव्या होत्या. पुढील चेंडूवर जेसन होल्डरने चौकार लगावत सामना जिंकला.