फुलराणी सायना – पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र; घटस्फोटाच्या निर्णयानंतर 20 दिवसांतच घेतला यु टर्न

फुलराणी सायना – पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र; घटस्फोटाच्या निर्णयानंतर 20 दिवसांतच घेतला यु टर्न

Phulrani Saina – Parupalli Kashyap reunited; took a U-turn within 20 days of divorce decision : बॅडमिंटन स्टार (Badminton Player) सायना नेहवालने तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून वेगळे (Saina Nehwal P Kashyap Divorce) झाल्याची घोषणा केली होती. सायनाने सोशल मीडियावर इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती शेअर केली होती, ज्यामध्ये तिने एक भावनिक नोट लिहिली की, दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला (Saina Nehwal News) आहे. मात्र त्यांनी त्यांच्या या निर्णयावरून 20 दिवसांतच यु टर्न घेतला आहे. त्यांनी आता आपण पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत.

काय म्हणाली सायना नेहवाल?

त्याबाबत इंस्टाग्राम वर एक पोस्ट करत सायना नेहवालने लिहिलं की, कधी-कधी दुरावा तुम्हाला एखाद्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करत आहोत. तसेच या पोस्टमध्ये तीने पती कश्यप सोबतचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये पर्यटन स्थळी गेलेली दिसत आहे.

ज्येष्ठांसाठी बातमी! रेल्वे तिकीट दरात सवलत मिळणार? रेल्वेमंत्र्यांचा संसदेत मोठा खुलासा

या अगोदरची सायनाची पोस्ट

आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांसाठी शांती, वाढ आणि निरोगी जीवन निवडण्याचा निर्णय घेतला (Saina Nehwal Love Story) आहे. मी या संस्मरणीय क्षणांबद्दल कृतज्ञ आहे. भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. यावेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद, असं सायनाने या पोस्टमध्ये म्हटलंय.

दु:खद घटना! जीममध्ये वर्कआऊट करताना युवा क्रिकेटरचं हृदयविकाराने निधन

सायना नेहवालने अन् पारुपल्ली कश्यपची प्रेमकहाणी

दोघांची प्रेमकहाणी बॅडमिंटन कोर्टपासून सुरू झाली. सायना आणि कश्यप हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये भेटले, जिथे त्यांनी एकत्र प्रशिक्षण घेतले. मैत्रीपासून सुरू झालेले हे नाते हळूहळू प्रेमात बदलले आणि दोघांनी 14 डिसेंबर 2018 रोजी लग्न केले. सायनाचा जन्म हरियाणातील हिसार येथे झाला. ती पारुपल्ली कश्यपपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. लग्नाच्या वेळी सायना 28 वर्षांची होती आणि कश्यप 31 वर्षांचा होता. 2020 मध्ये सायनाने राजकारणात प्रवेश केला आणि भाजपमध्ये सामील झाली.

यशस्वीचा दणका! इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करत शतक झळकावलं; टीम इंडियाचंही रेकॉर्ड

कारकिर्द कशी राहिली?

सायना नेहवालची बॅडमिंटन कारकीर्द खूप गौरवशाली राहिली आहे. तिने 2005 मध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आशियाई उपग्रह स्पर्धा जिंकून तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात केली. सायनाने 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारताला अभिमान वाटला. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकली. 2015 मध्ये सायना जगातील नंबर-1 बॅडमिंटनपटू बनली. ही भारतीय महिलेसाठी पहिलीच वेळ होती. पारुपल्ली कश्यपने 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरी सुवर्णपदक जिंकले. 2013 मध्ये तो जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube