New Zealand Beat Zimbabwe : न्यूझीलंडने झिम्बाब्वेला दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी (New Zealand vs Zimbabwe) सामन्यात एक डाव आणि 359 धावांनी पराभूत केले. या विजयानंतरही न्यूझीलंड WTC गुणतालिकेत कोणताही बदल करू शकली नाही. न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता. या विजयासह न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने मालिकाही जिंकली. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सर्कलमध्ये नव्हती. त्यामुळे या विजयाचे कोणतेही गुण न्यूझीलंडला मिळाले नाहीत. दुसरीकडे भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. यानंतर WTC गुणतालिकेत टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली.
दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून झिमाम्ब्वेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ फक्त 125 धावांवर ऑलआउट झाला. मॅट हेनरीने पाच विकेट घेतल्या. यानंतर न्यूझीलंडने फलंदाजीत कमाल केली. तीन फलंदाजांनी शतके ठोकली. डेवोन कॉन्वेने 153, हेनरी निकल्सने 150 आणि रचिन रवींद्रने 165 धावांची खेळी केली. या खेळाडंच्या शतकांच्या जोरावर पहिल्या डावात न्यूझीलंडने 601 धावांचा डोंगर उभा केला.
भारत-इंग्लंड मालिकेतील खेळपट्ट्यांची रेटिंग जारी; ICC ने ‘या’ मैदानाला दिला पहिला नंबर
यानंतरच्या दुसऱ्या डावातही झिम्बाब्वेचे फलंदाज अपयशी राहिले. फक्त 117 धावांवर अख्खा संघ तंबूत परतला. न्यूझीलंडकडून जेकरी फाउलकसने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्यामुळे न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयासह दोन सामन्यांची मालिका देखील न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने जिंकली. डेवोन कॉन्वेला प्लेयर ऑफ द मॅच आणि मॅट हेनरीला प्लेयर ऑफ सीरिजचा मान मिळाला.
या विजयाने WTC गुणतालिकेत कोणताही फरक पडला नाही. कारण ही मालिका WTC सायकलमध्ये समाविष्ट नव्हती. दुसरीकडे भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवली. यामुळे भारत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर कायम आहे. श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.
बांग्लादेश पाचव्या तर वेस्टइंडिज सहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका या संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा सामना अजून खेळलेला नाही. त्यामुळे हे संघ अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत.
टीम इंडियासाठी बॅडन्यूज! दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू आशिया कपमधून बाहेर?, कधी होणार वापसी