Download App

टी-20 ची क्रेझ घटली? सूर्यकुमार यादवच्या पत्रकार परिषदेला फक्त दोनच पत्रकार…

Suryakumar Yadav : वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडिया आता टी-20 मालिकेसाठी (T-20 series) सज्ज झाली आहे. टीम इडिया आणि ऑस्ट्रेलिया (Australia)यांच्यामध्ये टी-20 मालिका होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून पाच दिवसांची मालिका सुरु होत आहे. त्याचा पहिला सामना विशाखापट्टणम् (Visakhapatnam)येथे होणार आहे. या मालिकेचं सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे.

भारतीय वायुसेनेत 317 जागांसाठी भऱती, 1 लाख 77 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

त्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फक्त दोनच पत्रकारांनी उपस्थिती दर्शवली. अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली. त्यामुळे सूर्यकुमार यादव जेव्हा पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचला तसा त्याला चकीत होऊन म्हणाला की, फक्त दोघेच जण? अशा परिस्थितीत भारतात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला इतक्या कमी लोकांनी हजेरी लावली.

Rohit Pawar : केवळ अस्मितेच्या गप्पा मारू नका; उद्योगांवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

त्यातच ऑस्ट्रेलियाचे कर्णधार मॅथ्यू वेडने बुधवारी पत्रकार परिषद घेतली पण ही परिषदही रद्द करण्यात आली. पत्रकारांच्या कमतरतेमुळे हे घडले की दुसरे काय कारण होते? हे आता सांगता येणार नाही, असेही सूर्यकुमार म्हणाला. सूर्यकुमार कॉन्फरन्समध्ये पोहोचताच गर्दी पाहून त्यांच्या तोंडून एवढंच निघालं की दोन माणसं? चार मिनिटांच्या पत्रकार परिषदेनंतर टी-20 कर्णधाराने हसत हसत परिषद संपवली.

साधारण भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्रकार परिषदा बराच वेळ चालतात. त्यामध्ये त्यांना अनेक अवघड प्रश्न विचारले जातात. घरच्या मालिकेदरम्यान अनेकदा असे वातावरण असते की सर्व पत्रकारांना बोलण्याची समान संधी मिळावी, म्हणून बीसीसीआयच्या मीडिया मॅनेजरला हस्तक्षेप करावा लागतो. मात्र अनेकवेळा काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, मात्र पहिल्यांदाच याच्या उलट चित्र पाहायला मिळालं.

हे दोन्ही पत्रकार पीटीआय आणि एएनआय या वृत्तसंस्थांचे असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनीही सूर्यकुमार यादवला विविध प्रश्न विचारले. सूर्याच्या उत्तरांवरुन तो सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी आधीच तयार असल्याचं स्पष्ट झालं. वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर सर्वच खेळाडूंमध्ये नैराश्य स्पष्टपणे दिसून येत आहे. फक्त खेळाडूच नाही तर सपोर्ट स्टाफमध्येही नैराश्य दिसून आलं आहे.

Tags

follow us