Download App

IPL 2023: विजयासाठी गुजरातपुढे 179 धावांचे आव्हान

मुंबई : प्रेक्षकांची उत्सुकता संपली असून आजपासून आयपीएलचे 16 वे सीझन सुरु झाले आहे. या सीझनमधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात हा झाला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्सला विजयासाठी 179 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. विशेष म्हणजे या सामन्यात मराठमोळ्या ऋुतुराज गायकवाडने तुफान फटकेबाजी केली. ऋतुराजने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली.

धाराशिवचा राजवर्धन हंगरगेकर ‘कॅप्टनकूल’ धोनीसोबत मैदानात

तत्पूर्वी गुजरात संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या काही षटकात गुजरातने चेन्नईच्या फलंदाजांना धावा काढण्यापासून रोखले होते. दोन षटकात फक्त दोन धावा करता आल्या होत्या. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाडने गुजरातच्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत अवघ्या 23 चेंडूत अर्धस्थाक झळकावले तसेच त्याने सामन्यात सर्वोच्च 92 धावा केल्या. यावेळी त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

IPL 2023 : ऋतुराजने फक्त 23 चेंडूत झळकावले अर्धशतक

दरम्यान गुजरात संघाकडून मोहम्मद शामी, राशिद खान आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत विजय मिळवण्यासाठी गुजरातला 20 षटकात 179 धावांची गरज आहे. पहिला सामना कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us