IPL 2023 : ऋतुराजने फक्त 23 चेंडूत झळकावले अर्धशतक

IPL 2023 : ऋतुराजने फक्त 23 चेंडूत झळकावले अर्धशतक

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अशी स्पर्धा म्हणजे आयपीएल (IPL) ही होय. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर असतात. यातच आजपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) व गुजरात टायटन्समध्ये (Gujarat Titans) खेळवला जात आहे. यामध्ये मराठमोळा ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) तुफानी फलंदाजी करत अवघ्या 23 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आहे.

ऋुतुराजची फटकेबाजी, झळकावले अर्धशतक
ऋतुराज गायकवाड याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. सध्या ऋतुराज हा 76 धावांवर खेळात असून यामध्ये चार चौकार तर आठ षटकार लगावले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube