धाराशिवचा राजवर्धन हंगरगेकर ‘कॅप्टनकूल’ धोनीसोबत मैदानात

धाराशिवचा राजवर्धन हंगरगेकर ‘कॅप्टनकूल’ धोनीसोबत मैदानात

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अशी स्पर्धा म्हणजे आयपीएल (IPL) ही होय. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर असतात. यातच आजपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) व गुजरात टायटन्समध्ये (Gujarat Titans) खेळवला जात आहे. यामध्ये महाराष्ट्राचा राजवर्धन हंगरगेकर हा चेन्नईकडून खेळणार आहे. राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) हा अष्टपैलू खेळाडू असून महाराष्ट्राचा हा खेळाडू थेट धोनीच्या संघात खेळणार असल्याने प्रेक्षक देखील त्याचा खेळ पाहण्यास उत्सुक असणार आहे.

राजवर्धन हंगरगेकर हा महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील रहिवासी आहे. त्याने आपल्या खेळाने थेट आयपीएलमध्ये एंट्री केली आहे. आयपीएलसाठी राजवर्धन हंगरगेकरची 30 लाख बेस प्राईज असताना चेन्नई सुपर किंग्जने त्याला तब्बल दीड कोटी रूपये मोजून ताफ्यात घेतले होते. यंदा त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली आहे.

राजवर्धन हंगरगेकर याने भारताच्या अंडर 19 विश्वचषकमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्याकडे चेन्नई संघाच्या नजर गेल्या. राजवर्धन हंगरगेकर हा अष्टपैलू खेळाडू असल्याने चेन्नईने त्याला आपल्या संघात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे तो आज पहिला आयपीएल सामना खेळतो आहे.

नगर जिल्ह्यात सर्वाधिक दहशत संगमनेरात, थोरातांचा विखेंना टोला

जाणून घ्या राजवर्धनचा परिचय
तुळजापुर येथील माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांचा राजवर्धन हा नातू आहे. क्रिकेटचे वेड असल्याने याचे शिक्षण घेण्यासाठी त्याने पुणे गाठले. त्याने केवळ स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एवढे मोठे यश मिळवले आहे. राजवर्धन हंगरगेकर अंडर 19 संघाचा भाग झाला. तिथे त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. आज त्याला चेन्नई संघात प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube