Download App

Davis Cup साठी तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तानात; केंद्र सरकारने दिली परवानगी

Davis Cup Team India Tour for Pakistan : भारतीय टेनिस संघ (Team India) तब्बल साठ वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. लवकरच होणाऱ्या डेव्हिस चषकाच्या (Davis Cup) सामन्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने डेव्हिस चषक संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी व्हिजा जारी केला आहे.

Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणारा डेव्हिस चषकाक स्पर्धेतील हा जागतिक गट-एक सामना तीन आणि चार फेब्रुवारीला पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात खेळवला जाणार आहे. दरम्यान राजकीय तणावामुळे भारतीय खेळाडू पाकिस्तानमध्ये हा सामना खेळायला जाणार नाही. यासाठी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे हा सामना दुसऱ्या कुठल्यातरी देशांमध्ये हलवण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने ही विनंती फेटाळली.

अखेर नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा होणार शपथविधी

त्यानंतर अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने भारतीय संघाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी सरकारकडे मागणी केली. तर भारतीय संघ या दौऱ्यावर गेला नसता. तर आंतरराष्ट्रीय त्यांनीच महासंघाने पाकिस्तानला वॉक ओव्हर दिला असता. त्या अगोदर तब्बल साठ वर्षांपूर्वी म्हणजे 1964 ला हाच डेव्हिस चषक भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळला होता. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता.

2019 ला जेव्हा सामना पाकिस्तानमध्ये होणार होता. तेव्हा तो कझाकिस्तानला हलवण्यात आला होता. त्यामुळे आता भारतीय टेनिस संघ आज पाकिस्तानला रवाना होऊ शकतो.

follow us

वेब स्टोरीज