Download App

दुसऱ्या T20 मध्येही खेळणार नाही दीपक चहर! हे आहे कारण

IND vs SA : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कदाचित दिसणार नाही. तो अद्याप दक्षिण आफ्रिकेत पोहोचू शकलेला नाही. या टी-20 मालिकेतूनच त्याला वगळले जाऊ शकते, असे मानले जात आहे. दीपक चहरच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याची प्रकृती खालावली आहे. याच कारणामुळे पहिल्या सामन्यातही उपलब्ध नव्हता.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यातही दीपक चहर अनुपस्थित होता. कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याला जावे लागले. त्याने मालिकेच्या मध्यावर बीसीसीआयकडून ब्रेक मागितला होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, दीपक चहरचे संघात पुनरागमन त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. जर तो बरा झाला नाही तर दीपक सध्या संघात येऊ शकणार नाही.

Article 370 : …तर मग नेहरुंनी ‘तात्पुरतं’ असा शब्द का वापरला? अमित शाहांनी विरोधकांना फटकारलं

दुखापतीमुळे दीपक संघातून बाहेर गेला होता
31 वर्षीय दीपक चहरने 2018 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र सततच्या दुखापतींमुळे तो आत आणि बाहेर होत राहिला. 5 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दीपकला केवळ 13 वनडे आणि 25 टी-20 सामने खेळता आले आहेत. या काळात त्याला टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांनाही मुकावे लागले. आयपीएलच्या शेवटच्या मोसमातही तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकला नव्हता.

ICC ने जाहीर केलं टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक, टीम इंडियाचा 20 जानेवारीला पहिला सामना

स्विंग बॉलिंग आणि अष्टपैलू
दीपक चहर केवळ वेगवान गोलंदाजीमध्येच घातक नाही, तर तो बॅटिंगही स्फोटक करतो. वेगवेगळ्या सामन्यात त्याने आपली अष्टपैलू कामगिरी दाखवली आहे. त्यामुळेच दुखापतींमुळे वारंवार टीम इंडियाबाहेर राहिल्यानंतरही टीम इंडियाच्या व्यवस्थापनाचा त्याच्यावर विश्वास कायम आहे.

Tags

follow us