Download App

आंदोलक कुस्तीपटूंचे ‘त्या’ अहवालाबाबत गंभीर आरोप…

Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी आज (दि.25) पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा (Bhupinder Singh Hooda)यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal)आणि इतर नेत्यांनीही दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

‘कुणाची सुपारी घेऊन ‘बारसू’ला विरोध करता ?’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जळजळीत सवाल !

ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, पोलीस एफआयआर का नोंदवत नाहीत? हे मला कळत नाही. सर्वोच्च न्यायालयावरील आमचा विश्वास आणखी वाढला आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. आमच्या मंचावर सर्वांचे स्वागत आहे. राजकीय पक्ष असो किंवा इतर कोणीही, भाजपला यायचे असेल तर त्यांचेही स्वागत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बजरंग म्हणाला की, तुम्ही कोणत्या व्यवस्थेबद्दल बोलत आहात? तुम्ही संपूर्ण व्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकली आहे. कायद्यापेक्षा मोठे काणीही नाही. आमच्यावर जे राजकारण झाले ते आम्हाला पुन्हा नको आहे. दुसरीकडे, कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नव्हते, अहवाल कसा सादर केला गेला? असाही सवाल यावेळी उपस्थित केला. बबिता फोगाटने सांगितले की, तिला अहवालावर सही करण्यास भाग पाडले गेले.

कुस्तीपटू विनेश फोगटने सांगितले की, कोणत्याही महिलेबाबत काही घडले तर ते सर्व सांगणे अवघड असते. आम्हाला धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे करू नका. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us