‘कुणाची सुपारी घेऊन ‘बारसू’ला विरोध करता ?’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जळजळीत सवाल !

‘कुणाची सुपारी घेऊन ‘बारसू’ला विरोध करता ?’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जळजळीत सवाल !

Devendra Fadnavis on Barsu Refinery : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले आहे.

फडणवीस म्हणाले, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी रिफायनरी आहे त्यात केंद्र सरकारच्या तीन ऑइल कंपनी एकत्रित येऊन देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक करत आहेत. यामुळे जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. मागच्या काळात नाणार येथे ही रिफायनरी करण्याचे ठरले होते. तेव्हा श्रीमान उद्धव ठाकरेंनी या गोष्टीला विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं उशिरा आलं पण आलं. त्यामुळे बारसूला रिफायनरी करा असं पत्र त्यांनी पाठवलं. आता पुन्हा तेच विरोध करत आहेत.

करोडोंचा चुराडा करणाऱ्या सरकारची हाव कमी होणार का ?; ‘त्या’ फर्मानावर तनपुरेंचा संताप

या प्रकल्पाबाबत कुणाच्या मनात काही शंका असेल तर आम्ही उत्तरे देण्यासाठी तयार आहोत. येथील भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय होणार नाही. पण, त्याचवेळी जे राजकारणासाठी विरोध करत आहेत त्यांचा विरोध सहन करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, रिफायनरीसाठी आपण जी जमीन निवडली आहे ती कातळ आहे. त्यातलं जे कातळ हेरिटेज आहे ते आम्ही सोडून दिलं आहे. मुंबईत येऊन प्रकल्पाला विरोध करत आहेत हे आता थांबलं पाहिजे. कधी आरेला विरोध करायचा, कधी पोर्टला विरोध करायचा, कधी समृद्धी महामार्गाला विरोध करायचा असा विरोध करून तुम्ही काय केलं, असा सवाल फडणवीस यांनी केला.

भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

ते म्हणाले, जे लोक आता विरोध करत आहेत त्यांना मला विचारायचं आहे की नेमकी कुणाची सुपारी घेऊन हा विरोध तुम्ही करत आहात. प्रकल्प बाहेर जातात म्हणून बोंब मारायची आणि प्रकल्प येत आहेत तेव्हा विरोध करायचा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube