IND vs ENG : टीम इंडियाने (Team India) संघाने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने खेळाच्या चौथ्या दिवशी (२६ फेब्रुवारी) १९२ धावांचे लक्ष्य गाठले. शुभमन गिल ५२ धावा करून नाबाद राहिला आणि ध्रुव जुरेल ३९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली.
PM Modi यांच्याकडून समुद्रतळ गाठत द्वारकेचे दर्शन, स्कुबा डायविंगचा घेतला आनंद; पाहा फोटो
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या 353 धावांना प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. पण ध्रुव जुरेलने एकट्याने किल्ला लढवला. ध्रुवने ९५ धावांची खेळी खेळली. ध्रुवच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. ध्रुवच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडिया ३०० चा टप्पा पार करू शकली. टीम इंडियाचा डाव ३०७ धावांवर संपला आणि इंग्ल्डच्या टीमला ४६धावांची आघाडी मिळाली.
Article 370: ‘आर्टिकल 370’च्या निर्मात्यांना मोठा झटका, ‘या’ ठिकाणी घातली बंदी
यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १४५ धावा करून टीम इंडियासमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. ते टीम इंडियाने ६१ षटकांत ५ विकेट्स गमावून पार केले.
An unbeaten 72*-run partnership between @ShubmanGill & @dhruvjurel21 takes #TeamIndia over the line!
India win the Ranchi Test by 5 wickets 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ORJ5nF1fsF
— BCCI (@BCCI) February 26, 2024
चौथ्या दिवसाचा खेळ
कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी ८४ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र जेम्स अँडरने जो रूटच्या चेंडूवर झेल घेत इंग्लंडला पहिली विकेट मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. यशस्वीने ३७ धावा केल्या. यशस्वीनंतर रोहितने काही काळ गड राखून अर्धशतक झळकावले. पण रोहित ५५ धावा करून परतला. रजत पाटीदार येताच शून्यावर परतला.
१२० धावांत ५ विकेट पडल्या, मग जुरेल-गिलनचा चमत्कार
यानंतर शोएब बशीरने रवींद्र जडेजा आणि सरफराज खान या दोघांनाही सलग दोन चेंडूत बाद केल्याने टीम इंडिया आता अडचणीत आली आहे. १२० धावांवर पाच विकेट पडल्यामुळे भारताला उपयुक्त भागीदारीची नितांत गरज होती. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल यांनी चाहत्यांना निराश न करता भारताला संकटातून बाहेर काढले आणि विजयाकडे नेले. गिल आणि जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची नाबाद भागीदारी केली.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फॉक्स, टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.