World Cup 2023 : टीम इंडियाने टॉस जिंकला! फलंदाजीचा निर्णय

World Cup 2023 : टीम इंडियाने टॉस जिंकला! फलंदाजीचा निर्णय

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम (World Cup 2023) टप्प्यात आला आहे. साखळी फेरीत आज टीम इंडियाचा सामना नेदरलँड्स विरोधात होणार आहे. यानंतर सेमी फायनल राऊंडला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. 16 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. साखळी फेरीतील हा अखेरचा सामना आहे. हा सामनाही जिंकण्याच्याच इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे नेदरलँड्सचा (Netherlands) संघ स्पर्धेतून बाद झाला आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी संघ व्यवस्थापनाने भारतीय संघात कोणताही बदल केलेला नाही. सेमीफायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. या सामन्याआधी रणनितीत कोणताही बदल केला जाणार नाही, असे संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याचीही शक्यता असल्याचे सांगितले जात होते. मात्र तसे काही झाले नाही. प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादव या दोघांना कदाचित विश्रांती मिळू शकते. तर आर. अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो अशी शक्यता होती. परंतु, कोणताही बदल झालेला नाही.

World Cup 2023 : भारताचा सलग आठवा ‘विराट’ विजय, दक्षिण आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा !

असा असेल भारताचा  संघ

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूत रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, शमी, सिराज यांचा समावेश असू शकतो.

मुंबईत भिडणार भारत आणि न्यूझीलंड 

या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतापुढे आता चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. 2019 मधील विश्वचषकामध्येही भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगला होता. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर आता भारताकडे मागील उपांत्य फेरीचा बदला घेण्याची मोठी संधी असणार आहे. यावेळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार! 

कोलकातामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना कांगारूंशी होणार 

यानंतर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे. तर आफ्रिकेला कायमच रिकाम्या हाती मायदेशी परतावे लागले आहे. आफ्रिका संघाने यापूर्वी अनेक वेळा चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पण मोक्याच्या क्षणी कच खाल्याने आफ्रिका बाहेर पडत आली आहे. मात्र यावेळी टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिले विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube