Ashes Series 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅम येथे खेळला जात आहे. रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 386 धावांवर सर्वबाद झाला होता. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मात्र पावसामुळे खेळ खराब झाला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे सामना दोनदा थांबला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 28 धावा केल्या. वृत्त लिहेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नव्हता. रात्री 10.20 वाजेपर्यंत सामना सुरू झाला नव्हता. (eng-vs-aus-1st-test-3rd-day-rain-stops-play-england-lead-by-35-runs-birmingham-ashes-series)
बर्मिंगहॅमचे कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस तर किमान 13 अंश सेल्सिअस राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र यासोबतच पाऊसही पडणार आहे. वृत्त लिहिपर्यंत रविवारी रात्री 10.20 वाजेपर्यंत पाऊस झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे. सोमवारी आकाश ढगाळ राहील. मात्र पाचव्या दिवशी पुन्हा पावसाची शक्यता आहे. बर्मिंगहॅममध्ये मंगळवारी पाऊस पडू शकतो.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
वृत्त लिहेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 28 धावा केल्या होत्या. जॅक क्रॉली 7 धावा करून बाद झाला. बेन डकेटने 19 धावा केल्या. त्याने 28 चेंडूंचा सामना केला आणि चौकार मारून बाद झाला. ओली पॉप आणि जो रूट खातेही उघडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्सने 5.3 षटकात 9 धावा देत 1 बळी घेतला. बोलंडने 2 षटकात केवळ 1 धाव देत 1 बळी घेतला.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा केल्या होत्या. यादरम्यान उस्मान ख्वाजाने 141 धावांची शानदार खेळी केली. अॅलेक्स कॅरीने 99 चेंडूत 66 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.