Video : विषय एका रनआऊटचा; पण थेट दोन पंतप्रधान उतरले मैदानात

Eng Vs Aus 2nd Test 2023 : लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 मधील ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचला होता. खेळाच्या पाचव्या दिवशी इंग्लिश यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो विचित्र पद्धतीने रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. बेअरस्टो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून तो चांगलाच संतापलेला दिसत होता. बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात ऑस्ट्रेलियन […]

Letsupp Image   2023 07 04T165406.877

Letsupp Image 2023 07 04T165406.877

Eng Vs Aus 2nd Test 2023 : लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 मधील ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचला होता. खेळाच्या पाचव्या दिवशी इंग्लिश यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो विचित्र पद्धतीने रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. बेअरस्टो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून तो चांगलाच संतापलेला दिसत होता. बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या चाणाक्षपणाने महत्त्वाची भूमिका बजावली. ( Ashesh Series Johny Bairstow Runout )

पाचव्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात इंग्लंड संघाच्या 52 व्या ओव्हरमध्ये जॉनी बेअरस्टो रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करणारा कॅमेरून ग्रीन सातत्याने शॉर्ट पिच बॉल टाकत होता. अशा स्थितीत ओव्हरमधील शेवटचा बॉल सोडल्यानंतर लगेचच बेअरस्टो क्रीजच्या बाहेर गेला. दरम्यान, अॅलेक्स कॅरीने कॅच घेताच बॉल थेट विकेटवर फेकला. त्यानंतर थर्ड अंपायरने बेअरस्टोला रन आऊट दिले.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

यानंतर मात्र, मैदानावर इंग्लंडच्या दर्शकांनी चीटर-चीटर अशी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. हा वाद आता एवढ्या विकोपाला गेला आहे की, दोन देशाच्या पंतप्रधानांनी यात उडी घेतली आहे. बेअरस्टोच्या रन आऊटवर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, बेअरस्टोला वादग्रस्त पद्धतीने बाद करणे खेळ भावनेच्या पूर्णपणे विरुद्ध होते. इंग्लंडचे पंतप्रधान त्यांच्या संघाचा कर्णधार बेन स्टोक्सच्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना ऑस्ट्रेलियन संघाप्रमाणे कोणताही सामना जिंकायला आवडणार नाही. मला खात्री आहे की हेडिंग्ले कसोटीत आम्ही पुनरागमन करू.

यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले की, आम्हाला आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. पुरुष आणि महिला संघांनी त्यांचे पहिले दोन्ही ऍशेस कसोटी सामने जिंकण्यात यश मिळविले. ही एक अद्भुत गोष्ट आहे.
दरम्यान, लॉर्ड्स कसोटी सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला सतत मीडियाच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. याला उत्तर म्हणून दुसऱ्या दिवशी ऑस्टेलियाच्या मीडियानेदेखील इंग्लंडच्या संघावर टीकेची झोड उठवली आहे.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

आत्तापर्यंत या मालिकेत ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी 43 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 2023 मधील अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना 6 जुलैपासून हेडिंग्ले येथे खेळवला जाणार आहे.

Exit mobile version