WTC गुणतालिकेत इंग्लंडला मोठा धक्का, 12 गुणांचा फटका; भारताची परिस्थिती काय?

WTC Points Table : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. या सामन्यानंतर

WTC Points Table

WTC Points Table

WTC Points Table : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. या सामन्यानंतर आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 12 गुण वजा केले आहेत. तर दुसरीकडे या सामन्यात देखील इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागण्याने इंग्लंडला डबल फटका बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, इंग्लंडचा संघ निर्धारित वेळेत 12 षटके मागे राहिला होता. गुण वजा झाल्यानंतर, इंग्लंडकडे आता 38 गुण आहेत आणि ते डब्लूसीटी गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर अपडेटेड डब्लूसीटी गुणतालिका जाहीर करण्यात आली आहे. इंग्लंड संघाला मोठा फटका बसला असून त्यांची गुण टक्केवारी 34.72 वरून 26.38 पर्यंत खाली आली आहे. पराभव आणि त्यासोबतच 12 गुणांचा दंड यामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत इंग्लंडने 12 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चार विजय, सात पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.

ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाने आठपैकी सात कसोटी सामने जिंकले आहेत आणि केवळ एक सामना गमावला आहे. त्यांची गुण टक्केवारी 87.50 इतकी आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी चार सामने खेळले असून तीन विजय आणि एका पराभवासह त्यांची गुण टक्केवारी 75.00 आहे. श्रीलंका 66.67 गुण टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत दोन सामने खेळले असून एक जिंकला आहे आणि एक अनिर्णित राहिला आहे.

भारत सहाव्या स्थानावर

भारतीय संघ सध्या डब्लूसीटी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दोनदा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या या संघाने सध्याच्या डब्लूसीटी सायकलमध्ये एकूण नऊ सामने खेळले आहेत, ज्यात चार विजय, चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने 52 गुण मिळवले असून त्यांची गुण टक्केवारी 48.15 इतकी आहे. या गुणतालिकेत बांगलादेशचा संघ भारताच्या पुढे आहे.

बांगलादेश 58.33 गुण टक्केवारी आणि 28 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी खेळलेल्या चार सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत, एक गमावला आहे आणि एक अनिर्णित राहिला आहे.

Exit mobile version