England Ashes Squad : नोव्हेंबर 2025 सुरु होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. या संघाचा नेतृत्व बेन स्टोक्स करणार आहे. तर हॅरी ब्रूक उपकर्णधार असणार आहे. तर दुसरीकडे या संघात स्टार गोलंदाज मार्क वूडची देखील निवड करण्यात आली आहे. वूडने शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2024 मध्ये खेळला होता. तर या संघात वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सची फिटनेस नसल्याने निवड करण्यात आली नाही. भारताविरुद्धच्या ओव्हल कसोटीत क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. तर इंग्लंडने मॅथ्यू पॉट्स आणि विल जॅक्स यांना देखील जागा दिली आहे.
वेगवान गोलंदाज पॉट्सने डिसेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा (Ashes Squad) कसोटी सामना खेळला होता, तर जॅकने डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पॉट्सने या हंगामात 10 काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतले आहेत, ज्यामध्ये 84 धावांत 4 विकेट्स त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दरम्यान, जॅकने फक्त तीन डावात 136 धावा केल्या आहेत.
अॅशेससाठी इंग्लंडचा संघ (England Ashes Squad) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहे. यामुळे या संघात 6 वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये आर्चर, पॉट्स, ब्रायडन कार्से, गस अॅटकिन्सन, जोश टंग आणि वूड यांचा समावेश आहे. तर शोएब बशीर याची मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.
बेन स्टोक्स (कर्णधार), जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (उपकर्णधार), ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, मार्क वूड, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, शोएब बशीर.
Sixteen players 🧢
Three Lions 🦁
One goal 👊 pic.twitter.com/uKhXSjj9NL— England Cricket (@englandcricket) September 23, 2025
तर दुसरीकडे अॅशेसपूर्वी इंग्लंड 18 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर हॅरी ब्रूक संघाचा नेतृत्व करणार आहे. स्मिथ आणि आर्चरला न्यूझीलंड टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर झॅक क्रॉलीला पहिल्यांदाच इंग्लंड टी-20 संघात समाविष्ट करण्यात आले आहे. सॅम करन आणि लियाम डॉसन यांचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.
3 x IT20s 🏏 3 x ODIs 🏏
Our squads to tour New Zealand in October are here! 👇
— England Cricket (@englandcricket) September 23, 2025
हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बंटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, जो रूट, जेमी स्मिथ, ल्यूक वूड.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, सोनी बेकर, टॉम बंटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, झॅक क्रॉली, सॅम करन, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल साल्ट, ल्यूक वूड.