Video : स्टीव स्मिथवर पुन्हा चिटींगचा आरोप; कॅच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

England vs Australia Steve Smith The Ashes 2023: अ‍ॅशेस मालिकेतील 2023 मधील दुसरी कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. आता इंग्लंडचा संघ पहिला डाव खेळत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 4 गडी गमावून 278 धावा केल्या होत्या. ( Eng Vs Aus 2nd Test )  या सामन्यादरम्यान स्टीव्ह […]

Letsupp Image   2023 06 30T162109.157

Letsupp Image 2023 06 30T162109.157

England vs Australia Steve Smith The Ashes 2023: अ‍ॅशेस मालिकेतील 2023 मधील दुसरी कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. आता इंग्लंडचा संघ पहिला डाव खेळत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 4 गडी गमावून 278 धावा केल्या होत्या. ( Eng Vs Aus 2nd Test )  या सामन्यादरम्यान स्टीव्ह स्मिथच्या एका झेलवरून वाद झाला होता. स्मिथने जो रूटचा  (Joe Root )  झेल घेतला तो वादग्रस्त ठरला. स्मिथच्या या झेलबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. ( Steve Smith Catch )

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

इंग्लंडच्या पहिल्या डावात रुट क्रमांक 4 वर फलंदाजीला आला. यादरम्यान तो 19 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. स्टार्कच्या चेंडूवर तो स्मिथकरवी झेलबाद झाला. चेंडू स्मिथच्या थोडा पुढे होता, त्याने पुढे धावत झेल घेतला. मात्र त्यानंतर तो जमिनीवर पडला, यादरम्यान त्याचा हात जमिनीवर आदळला. या कारणावरून झेल पकडीबाबत वाद झाला होता. इंग्लंडच्या चाहत्यांनी स्मिथच्या झेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या कॅचचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान, यानंतर स्टीव्ह स्मिथच्या झेलची तुलना डब्ल्यूटीसी फायनलमधील कॅमेरॉन ग्रीनच्या झेलशी केली जात आहे. सोशल मीडियावर यूजर्स ऑस्ट्रेलियन संघावर फसवणूक केल्याचा आरोपही करत आहेत. दरम्यान, 2018 साली कसोटी सामन्यात बॉल टेम्परींग केल्याचा आरोपाखाली स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात 4 गडी गमावून 278 धावा केल्या आहेत. यादरम्यान सलामीवीर जॅक क्रोली 48 धावा करून बाद झाला. त्याने 48 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले. बेन डकेटने ९८ धावांची शानदार खेळी केली. त्याने 134 चेंडूंचा सामना करत 9 चौकार मारले. ओली पॉपने 63 चेंडूंचा सामना करत 42 धावा केल्या. जो रूट अवघ्या 10 धावा करून बाद झाला. हॅरी ब्रूक 45 आणि बेन स्टोक्स 17 धावा करून नाबाद राहिले

 

Exit mobile version