Download App

Chess World Cup : प्रज्ञानानंदाचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले; अंतिम सामन्यात कार्लसनकडून पराभूत

  • Written By: Last Updated:

FIDE Chess World Cup Final :  बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानानंदाला (Pragnananda)जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने प्रज्ञानांनंदाचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले आहे. टायब्रेकमध्ये पहिल्याच गेममध्ये प्रज्ञानानंदाला पराभवाचा सामना करावा लागला. कार्लसनने पुढचा गेम ड्रॉ करून सामना जिंकला. अंतिम फेरीत दोन दिवसांत दोन सामने खेळले गेले जे अनिर्णित राहिले. यानंतर टायब्रेकरमधून स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला येथे मॅग्नस कार्लसनने जगज्जेते होण्याचा मान मिळविला.

टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यासाठी 25 -25 मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला टाय ब्रेकर सामना कार्लसनने जिंकला होतास तर दुसरा सामना प्रज्ञानंदला जिंकणं गरजेचं होतं. पण पहिला सामना जिंकल्यानंतर कार्लसनचा आत्मविश्वास वाढला होता.

‘आधी टोमॅटो अन् आता कांद्याचे भाव पाडले’; शेतकऱ्यांनी मोदींच्या अभिनंदनाचे बॅनरच झळकवले

त्यामुळे त्याने दुसऱ्या सामन्यात आपली खेळी खेळला. मात्र त्याला प्रज्ञानानंदने कडवी टक्कर दिली आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता बनला.

प्रज्ञानानंदने पाचवेळा विश्वविजेता कार्लसनसमोर आपल्या आगळ्यावेगळ्या खेळाचे प्रदर्शन केले. 32 वर्षीय कार्लसनने 2004 मध्ये ग्रॅंडमास्टर हा किताब पटकावला तेव्हा प्रज्ञानानंदचा जन्मही झालेला नव्हता.
Fighter: सिद्धार्थ आनंद ‘फायटर’ सिनेमासाठी एक खास गाणं शूट करणार?

प्रज्ञानानंदा रमेशबाबू याचा जन्म 2005 मध्ये तामिळनाडूच्या चेन्नईत झाला. त्याचे वडिल रमेशबाबू हे बॅंक कर्मचारी आणि आई नागलक्ष्मी गृहीणी आहे. मात्र वडिल पोलिओग्रस्त असल्याने घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यात त्याची मोठी बहिण वैशाली ही देखील बुद्धिबळपटू असून दोन वेळा युवा बुद्धिबळ चॅम्पियन आहे.

त्यामुळे रमेशबाबूंना आपल्या मुलाने बुद्धिबळपटू होऊ नये असं वाटत होतं. कारण कुटुंबाला या दोघांचा खर्च परवडत नव्हता. मात्र बुद्धीबळाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं अन् बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत तो. बुद्धीबळ खेळायला लागला.

त्यानंतर वडिलांनी कर्ज काढून त्याच्या या मुलांच्या खेळाला त्यांच्य करिअर बनवण्यासाठी पैसा उभा केला. रमेशबाबूंनी त्यांना मार्गदर्शनही केलं. मुलं विविध स्तरावर स्पर्धांमध्ये खेळू लागली. जिंकू लागले. त्यांच्या घरात सगळीकडे मुलांनी जिंकलेले कप आणि पदकं आहेत. वयाच्या 5 व्या वर्षापासून त्याने हा खेळ खेळायला सुरूवात केली. बुद्धीबळाची आवड वाढत गेली आणि प्रज्ञानानंदा दिवसातून 4-5 तास सराव करायला लागला. आणि दहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टरही झाला होता.

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्याला ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आणि भारतात ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरला. 2015 मध्ये चेन्नईत आलेले पुरात काही कप वाहून गेले होते. मात्र त्यातूनही प्रज्ञानानंदाने आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली.

बुद्धीबळातील ग्रँडमास्टर म्हणजे पीएचडी मिळवण्यासारखं आहे. लहान वयात ती मिळवणं सोपंही नाही. बुद्धिबळ खेळात दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. खुल्या जिथे कुणीही पैसे भरून खेळू शकतं. तर काही निमंत्रितांच्या जिथे रेटिंग महत्त्वाचं ठरतं. तर क्रिकेट प्रमाणेच बुद्धिबळातही सुरुवात, खेळाचा मध्य आणि शेवट असे तीन भाग असतात. जर सुरुवातीला तुमचा खेळावर ताबा असेल तर शेवटही तुम्ही चांगला करता. याचं तत्वावर प्रज्ञानानंद इथवर पोहचला.

Tags

follow us