Fighter: सिद्धार्थ आनंद ‘फायटर’ सिनेमासाठी एक खास गाणं शूट करणार?

Fighter: सिद्धार्थ आनंद ‘फायटर’ सिनेमासाठी एक खास गाणं शूट करणार?

Siddharth Anand: दिग्दर्शत सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) आगामी सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सिद्धार्थच्या पठाण (Pathaan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. त्याच्या वॉर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता सिद्धार्थचा फायटर (Fighter) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पठाणच्या जबरदस्त यशानंतर सिद्धार्थ आनंद त्याच्या आगामी प्रोजेक्ट ‘फायटर’ साठी जोरदार चर्चेत आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक सध्या बहुप्रतिक्षित एरियल अॅक्शन चित्रपटासाठी पार्टी अँथमवर काम करत आहेत आणि याच शूटिंग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याचं माहिती मिळत आहे. प्रॉडक्शनच्या जवळच्या एकाने याबाबत खुलासा केला की, “सिद्धार्थ आनंदच्या चित्रपटांमध्ये उत्तम संगीत आणि पार्टी गाणे शूट करणार आहे.

मग ते अंजाना असो, घुंगरू असो किंवा पठाण असो. फायटर यापेक्षा वेगळे असणार आहे. चित्रपटाची टीम सध्या एका गाण्यावर काम करत आहे. मुंबईतील एका भव्य सेटवर या गाण्याचं खास चित्रीकरण केले जाणार आहे. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर आणि बाकीचे कलाकार सध्या गाण्याची तयारी आणि तालीम करत आहेत आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शूटिंग सुरू होणार आहे.

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज होणार घोषणा

सलाम नमस्ते, बचना ए हसीनो, अंजाना अंजानी, बँग बँग, घुंगरू, झूम जो पठान आणि इतर अनेक सारख्या चार्ट-टॉपर्ससह सिद्धार्थ आनंदने त्याच्या चित्रपटांमधील संगीत नेहमीच चर्चेत राहील आहे. पुन्हा एकदा बॉलीवूडमधील मोस्ट वॉन्टेड मॅन आणखी एका भव्य अशा गाण्याने आपल्याला आश्चर्यचकित करणार यात काही शंका नाही.

सिद्धार्थ आनंदच्या फायटरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत. या स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेल्या “स्पिरिट ऑफ फायटर” या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळाली आणि प्रत्येकजण २५ जानेवारी २०२४ दिवशी प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube