FIFA World Cup : फिफा वर्ल्डकप 2026 मध्ये ब्राझील आणि मोरोक्को सामन्यात नवीन वाद निर्माण झाल्याने चाहते आता सोशल मीडियावर फिफा विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. 14 जून रोजी झालेला हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. हा सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला मात्र या सामन्यात पंचांचे काही निर्णय आणि तांत्रिक चुकांमुळे मोठा वाद निर्माण झाल्याने चाहते संतापले आहे.
ब्राझील विरुद्ध मोरोक्को सामना 1-1 बरोबरीत
या सामन्यात ब्राझीलचा सुपरस्टार नेयमार दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मोरोक्कोने (Morocco) या सामन्याच्या 21 व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलवर (Brazil) दबाव आणला होता. मोरोक्कोकडून इस्माईल सायबारीने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ब्राझीलने शानदार पुनरागमन केले. विनिअस ज्युनियरने मोरोक्कोच्या यासिन बोनूला चकवून गोल केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
दुसऱ्या हाफमध्ये कोणत्याही संघाला गोल करता आला नाही, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. ब्राझील आणि मोरोक्को या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आणि ‘ग्रुप सी’च्या गुणतालिकेत ते बरोबरीवर राहिले.
A thrilling draw. 🤩#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 14, 2026
वादग्रस्त VAR निर्णय
सामन्यादरम्यान VAR (व्हिडिओ असिस्टंट रेफरी) संबंधित एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला. एका प्रसंगी पंचांनी ब्राझीलला कॉर्नर किक दिली होती, परंतु VAR टीमने हस्तक्षेप केला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, चेंडूला स्पर्श करणारा शेवटचा खेळाडू ब्राझीलचा मॅथियस कुन्हा होता. परिणामी, कॉर्नर किकऐवजी मोरोक्कोला गोल किक देण्यात आली.
RBI ची मोठी कारवाई, ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध; कारण काय? –
सोशल मीडियावर चाहत्यांना या निर्णयाचे आश्चर्य वाटले, कारण सामान्यतः कॉर्नर किक किंवा गोल किकशी संबंधित निर्णयांमध्ये VAR हस्तक्षेप करत नाही.
