ICC कडून सौरव गांगुलीला मानाचं पान; क्रिकेट समितीची धुरा दादाच्या हाती..

सौरव गांगुलीला आयसीसीच्या मेन्स क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Sourav Ganguly

Sourav Ganguly

Sourav Ganguly Re-Appointed as ICC MCC Chairman : क्रिकेटविश्वात दादा नावनं ओळखला जात असेला माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आता नव्या इनिंगच्या तयारीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सौरव गांगुलीला मोठी जबाबदारी दिली आहे. गांगुलीला आयसीसीच्या मेन्स क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गांगुलीला याआधी पहिल्यांदा 2021 मध्ये चेअरमनपद मिळालं होतं. याआधी अनिल कुंबळेने चेअरमनपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. गांगुलीसह व्हीव्हीएस लक्ष्मणलाही या समितीत स्थान देण्यात आलं आहे.

गांगुलीसह व्हीव्हीएस लक्ष्मण, अफगाणिस्तानचा माजी क्रिकेटपटू हामिद हसन, वेस्टइंडीजचे दिग्गज प्लेयर डेसमंड हेन्स, दक्षिण आफ्रिका संघाचा कसोटी आणि वनडे टीमचा कर्णधार टेंबा बावुमा आणि इंग्लंडचा माजी खेळाडू जोनाथन ट्रॉट यांचा या समितीत समावेश आहे. महिला क्रिकेट समितीचा विचार केला तर न्यूझीलंडची माजी फिरकी गोलंदाज कॅथरीन कॅम्पबेलला चेअरपर्सन म्हणून नियुक्ती मिळाली आहे. यासह ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू एवरिल फाही, फ्लोत्सी मोसेकी यांचाही या समितीत समावेश आहे.

माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा अपघात; दुर्गापूर एक्सप्रेसवेवर घडली घटना

Exit mobile version