माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा अपघात; दुर्गापूर एक्सप्रेसवेवर घडली घटना
गांगुली सुखरूप असून ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली, परंतु पोलिसांनी त्वरित

Indian Cricket Captain Sourav Ganguly in Accident : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्या कारला काल गुरुवारी दुर्गापूर एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. (Accident ) गांगुली एका कार्यक्रमासाठी बर्दवानकडे जात असताना हा प्रकार घडला. त्यांच्या रेंज रोव्हर कारला एका लॉरीने अचानक धडक दिली, ज्यामुळे ताफ्यातील वाहनांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
अपघात कसा घडला?
दंतनपूरजवळ हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली यांच्या ताफ्यातील गाड्या सुसाट वेगात नव्हत्या, परंतु एका लॉरीने अचानक कट मारल्याने चालकाने जोरदार ब्रेक लावला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनी संतुलन गमावले आणि एक गाडी थेट गांगुलींच्या रेंज रोव्हरवर आदळली. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
भारताची धमाकेदार सुरुवात, शामी, गिल चमकले, बांग्लादेशचा 6 विकेटने पराभव
गांगुली सुखरूप असून ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली, परंतु पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातानंतर साधारण १० मिनिटांच्या विश्रांतीनंतर गांगुली पुन्हा आपल्या गंतव्यस्थानी रवाना झाले. बर्दवान विद्यापीठात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी बर्दवान स्पोर्ट्स असोसिएशनच्या एका विशेष कार्यक्रमालाही हजेरी लावली.
गांगुलींची प्रतिक्रिया
बर्दवानच्या कार्यक्रमात गांगुली म्हणाले,”मी भारावून गेलो आहे. बर्दवानला येणे खूप आनंददायक आहे. बर्दवान स्पोर्ट्स असोसिएशन अनेक वर्षांपासून मला बोलावत होती. आज इथे येऊन खूप छान वाटतंय. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि बर्दवान स्पोर्ट्स असोसिएशन यांचे ५० वर्षांचे संबंध आहेत. याच जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडले आहेत आणि भविष्यातही तसेच खेळाडू घडवले जातील.”
गांगुलींच्या सुरक्षेवर चर्चा
गांगुली यांचा ताफा आणि त्यांची सुरक्षा ही कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. बीसीसीआय अध्यक्षपदाच्या काळातही त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अनेकदा चर्चिला गेला होता. अपघातानंतर पुन्हा एकदा त्यांच्या सुरक्षिततेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अपघाताची बातमी समजल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, गांगुली सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.